शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला सरकारला वेळ नाही जारगाव येथील शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशींचे टिकास्त्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला सरकारला वेळ नाही जारगाव येथील शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशींचे टिकास्त्र

 

पाचोरा-( प्रतिनिधी ) आज केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जारगाव येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.

 

शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान, खडकदेवळा-लोहटार जिल्हा परिषद गटाचा शेतकरी मेळावा आज जारगाव येथे आयोजीत करण्यात आला. यात राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञ प्रा. सुदामसिंग राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघात फिरत असून सर्वसामान्यांचा मला अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. सर्वांनी दिलेल्या स्नेहामुळे मी भारावून गेली आहे. तात्यासाहेब यांच्यावर या मतदारसंघाने भरभरून प्रेम केले असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात आले असून जनतेने दिलेला प्रतिसाद हा भारावून टाकणारा आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी हा मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले असून याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

याप्रसंगी वैशालीताई पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. गिरणेवरील बंधाऱ्यांसाठी कुणीही प्रयत्न करत नाही. नदीतून बेसुमार वाळू उपसा झाल्याने गिरणा काठ उध्वस्त झाला असून यावर उपाययोजना करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर मतदारसंघात पायाभूत सुविधा देखील पूर्ण करण्यात आल्या नसल्याची प्रखर टिका त्यांनी याप्रसंगी केली. तर तात्यासाहेब यांच्या प्रमाणेच मतदारसंघाचा समग्र विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर रमेश बाफना, राजेंद्र पाटील,राजेंद्र देवरे, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, एडवोकेट अभय पाटील,बाळु अण्णा, गजू पाटील, शरद पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, बेबाताई पाटील, उषाताई परदेशी, गायत्री पाटील, मुकेश पाटील, सुरेखा वाघ, शशी बोरसे, प्रमोद नाना पाटील, तिलोत्तमा मौर्य, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र राणा, अनिल सावंत, शशी बोरसे, प्रदीप पाटील, राजेंद्र राणा, प्रशांत पाटील, बाजीराव शेडू पाटील, श्रीराम धोंडू पाटील, अशोक गंगाराम सोनवणे, दामू पाटील, संदीप पाटील यांची उपस्थिती होती.

 

 

शेतकरी मेळाव्याला अनिल महाजन, शरद कोळी, जगदीश गुजर, विनोद ठाकूर, दीपक परदेशी, वामन सोनवणे, विलास पाटील, बाळासाहेब भास्कर पाटील, शरद फकीरा पाटील, एकनाथ पाटील, शालिक भवरे, हिलाल पाटील, अरुण तांबे, शितल संजय पाटील, कांचन मराठे, राजेंद्र परदेशी, सर्जेराव पाटील, सुदाम देवरे, नाना देवरे, सचिन पाटील, शिवाजी कोळी, संजीव राजपूत, यशवंत माणिक पाटील, आनंदा मांगो पाटील, छबुलाल सूर्यवंशी, शांताराम पाटील, कैलास पाटील, भरत शिनकर, मनोज चौधरी यांच्यासह कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.