शिवाजी शिंदे यांना पीएचडी प्रदान सोहळा संपन्न 

शिवाजी शिंदे यांना पीएचडी प्रदान सोहळा संपन्न

 

नाशिक, दि. 15 (प्रतिनिधी) : पाचोरा (जि. जळगाव) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे शिक्षक शिवाजी शिंदे यांना बिहार विद्यापीठाच्या (निसर्गोपचार) महाराष्ट्र शाखेतर्फे ‘ऍक्युप्रेशर’ विषयात पी. एचडी. पदवी प्रदान करण्यात आली. नाशिक शाखेतर्फे येथील आजीचे पुस्तकांचे हॉटेल येथे हा पी. एचडी प्रदान सोहळा नुकताच झाला.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र विभाग केंद्रप्रमुख डॉ.शामकुमार दुसाने,मुद्रांक नियंत्रक आयुक्त के.आर.दवांगे, प्राचार्य श्रीकांत सोनवणे, अम्रौ कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीश पाटील, तन्मय प्रकाशनचे संचालक ब्रीजकुमार परिहार, शिक्षक प्रमुख चंद्रकांतदादा पाटील, डॉ. प्रतापराव देशमुख, डॉ. प्रज्ञा देशमुख आदी प्रमुख पाहुणे होते.

 

नाशिक निसर्गोपचार शाखेचे हीलर शामकुमार दुसाने यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, ” इंडियन कौन्सिल ऑफ ॲक्युप्रेशर योगा’द्वारा कार्यरत ॲक्युप्रेशर परिषद अंतर्गत ऍक्युप्रेशर या विषयातून प्रा. शिवाजी शिंदे यांनी पीएचडी संपादन केली आहे. ॲक्युप्रेशर आणि योगा सायन्स तसेच अल्टरनेटिव्ह मेडिसिन विषयातही त्यांनी यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण केला होता.”

 

त्यानिमित्त ॲक्युप्रेशर परिषद संलग्न महाराष्ट्र शाखेच्या नाशिक केंद्रातर्फे पुस्तकाची आई भिमाबाई जोंधळे यांच्या हस्ते शिवाजी शिंदे यांना सन्मान चिन्ह आणि पदवी देऊन गौरविण्यात आले. अक्षरबंध प्रकाशनचे प्रवीण जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रा. सोनावणे आणि डॉ. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.