भातखंडे खुर्द गावातील तरुणांचा शिवसेना-उबाठात प्रवेश

भातखंडे खुर्द गावातील तरुणांचा शिवसेना-उबाठात प्रवेश

 

पाचोरा, ( प्रतिनिधी ) : शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील गावातील तरूणांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

 

वैशालीताई सुर्यवंशी यांचे पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावात सायंकाळी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी ताईंनी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठोबा-रुक्माईचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वैशालीताई यांनी आपल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. यात शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतच व्यथा सांगितली.

 

भातखंडे खुर्द गावात ठिकठिकाणी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भातखंडे खुर्द गावात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिव संवाद यात्रेला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी गावातील गणेश मंडळाच्या ठिकाणी श्री गणरायाची आरती वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आली.

दरम्यान, या यात्रेच्या दरम्यान, गावातील प्रभाकर नाथ पाटील शेखर पाटील सतीश किसन कुमावत रामचंद्र बापू पाटील आदींसह अन्य तरुणांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैशालीताई सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी गावातील रामचंद्र बापू पाटील, उमाकांत कुमावत, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर नाना पाटील, महेंद्र दगडू बेलदार, सतीश किसन कुमावत, काशिनाथ नामदेव कुमावत, शेखर सागर पाटील, प्रभाकर रमेश कुमावत, राहुल कुमावत, संतोष चिंतामण बेलदार, सतीश वाल्मीक कुमावत, सुनील खैरनार, बापू कुमावत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.