पाचोऱ्याचा श्रेयस चिंचोलेच्या कलेला मुंबईतील गणेशा देखाव्यात world रेकॉर्ड.
आओ मिलकर ये कसम खाए, प्रदूषण को हम दूर भगाए, संदेश ये हम सब तक पहुँचाए, प्रदूषणमुक्त पर्यावरण बनाएँ’ या संकल्पनेवर आधारित मुंबई तील सायनच्या प्रतीक्षा नगर येथील फ्रैकलीन पॉल यांच्या घरी सुंदर देखावा साकरण्यात आला आहे. या सजावटीमध्ये जेजेच्या श्रेयश चिंचोले, यश शर्मा, झाकीर शेख, ऐश्वर्या खेतले, समृद्धी कदम, वरदराज तावरे आणि अभिलाषा जंगीर या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘गंगाघाट’ येथील सगळ्या वास्तूंचं मिनिएचर तयार करून ही थीम विद्याथ्यांनी डेकोरेट केली आहे. ही थीम मुख्यतः प्रदूषणावर आधारित आहे. आताच्या घडीला गंगा ही जगातील सर्वात प्रदूषित नदी मानली जाते; म्हणून या मातेसमान नदीत प्रदूषण करू नये हा सामाजिक संदेश या थीममधून देण्यात आला आहे. मुख्य संकल्पना आणि दिग्दर्शन हे फ्रैंकलीन पॉल यांचं असून विद्याथ्यांनी या संकल्पनेला कृतीत उतरवण्याचं काम टीम लीडर श्रेयश व त्यांच्या टीमने चोख बजावलं आहे. पाचोरा येथील रहिवासी बालाजी काँक्रिट प्रॉडक्ट्स चे संचालक गोपाल चिंचोले यांचा सुपुत्र श्रेयस चिंचोले याने नेतृत्व करून सुंदर देखावा सादर केला. या देखाव्यात सन बोर्ड मटेरियल चा वापर केला आहे.प्लास्टिक फिशर कंपनीलाही या देखाव्यात रीप्रेझेंट केले आहे
मुंबई तील प्रत्येक न्यूज पेपर ने या गणेशाची बातमी प्रसिद्धीस दिली. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर या देखाव्याने प्रचंड धुमाकूळ घातली. Utube इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, या वर ३५मिलियन च्या वर views मिळाले आहेत. प्रत्येकाने त्या सुंदर देखाव्याला like सबस्क्राईब करुन श्रेयस व त्याच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे
या व्यतिरिक्त ही विविध ठिकाणी डिस्प्ले डिझायनिंग चें वर्क त्यानें केले आहे.
श्रेयस हा सर जे. जे. अप्लाइड आर्ट येथे शेवटच्या वर्षात शिकत आहे.रंगश्री आर्ट फाउंडेशन च्या अंतर्गत सुबोध कांतायन यांच्या मार्गदर्शनात त्याने fine art cet ची तयारी करुन जे जे, मुंबई येथे प्रवेश मिळविला होता.
श्रेयशच्या ह्या कलात्मक व सामाजिक सुंदर देखाव्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहेआणि पाचोरा वासियांना याचा मोठा अभिमान वाटत आहे.