लाडकी बहीण योजना हाणून पाडण्यासाठी विरोधकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण त्याला यश आले नाही – आ.राजळे

लाडकी बहीण योजना हाणून पाडण्यासाठी विरोधकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण त्याला यश आले नाही – आ.राजळे

 

(सुनिल नजन/”चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) लाडकी बहीण योजनेच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एक लाख वीस हजार महिला पात्र झाल्या आहेत. विरोधकांनी ही योजना हाणून पाडण्यासाठी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण त्याला यथ आले नाही.लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.त्या मतदार संघातील कासार पिंपळगाव आणि मीरी जिल्हा परिषद बचतगटातील महीलांच्या मेळाव्यात बोलत होत्या.शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, लेक लाडकी योजना, मोफत एसटी प्रवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना,पीएम विश्वकर्मा योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ईत्यादी योजनांची माहिती देताना उपस्थित महीलांच्या मेळाव्यात बोलत होत्या.व्यासपीठावर प्रारंभी काशीबाई गोल्हार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कासार पिंपळगावच्या सरपंच सौ.मोनालीताई राजळे यांनी प्रास्ताविक केले. मंगगलताई कोकाटे,बंडू बोरुडे,भालसींग, म्रुत्युंजय गर्जे, बाजार समितीचे सभापती सुभाष रावबर्डे, विष्णूपंत अकोलकर,हे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. प्रारंभी दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अनेक गावातील महीलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडी अडचणी समजावून घेत आमदार राजळे यांनी अनेक महीलांशी हीतगुज केले. आकाशवाणी पुणे केंद्राचे समालोचक बंडा जोशी यांनी उपस्थित महीलांना हास्य विनोद व मनोरंजन करीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदार मोनिकाताई राजळे यांना हँट्रीक करीत मंत्री करण्यासाठी पुन्हा निवडून द्या असे आवाहन केले.काही त्रुटीमुळे अनेक महीलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी थेट आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. काही महीलांनी उखाणे, धार्मिक गीते गाउन ,गवळणी गाउन उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी काका शिंदे, नारायण पालवे, संदीप पठाडे, शुभम गाडे,श्रीकांत मिसाळ, चितळीचे सरपंच अशोक आमटे, गणेश कचरे,कुशिनाथ बर्डे यांच्या सह अनेक नेते उपस्थित होते. आभार आशाताई वाघ यांनी मानले. एकंदरीत हा महीलांचा मेळावा घेऊन आमदार राजळे यांनी विरोधकांना जोरदार शह देत आपल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची झलक दाखवून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.सार्थक मंगल कार्यालयात महीलांना बसण्यासाठी जागा अपुरी पडली होती. पहील्याच महिला मेळाव्याचे राजळेंचे तगडे नियोजन पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.