शेतकरी शिवसंवाद यात्रेदरम्यान शिवसेना-उबाठात जोरदार ‘इनकमींग’

शेतकरी शिवसंवाद यात्रेदरम्यान शिवसेना-उबाठात जोरदार ‘इनकमींग’ !

 

परिवर्तनाच्या लढ्यात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

 

पाचोरा, दिनांक १४ (प्रतिनिधी ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असतांनाच या यात्रेदरम्यान गावोगावी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. या माध्यमातून वैशालीताईंनी पुकारलेल्या परिवर्तनाच्या लढाईला जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

शेतकरी शिवसंवाद यात्रा आज खडकदेवळा-लोहटार गटात असून सकाळच्या सत्रात सारोळा बुद्रुक, वाघुलखेडा, खडकदेवळा बुद्रुक आणि डोंगरगाव प्रवेश या गावांमध्ये शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात आली. या सर्व गावांमध्ये यात्रेला स्वयंस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी ताईंचे औक्षण करण्यात आले. तर, प्रत्येक गावातील ज्येष्ठांचा ताईंनी आशीर्वाद घेतला. याप्रसंगी गावकऱ्यांशी केलेल्या वार्तालापात प्रामुख्याने रस्त्यांची दुर्दशा, बेरोजगारी, घरकुलांचा अभाव आदी समस्या कायम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वाघुलखेडा येथील अल्पसंख्यांक समुदायाच्या महिलांनी आपल्याला कोणत्याही योजनांचे लाभ मिळत नसून आमच्या भागात कामेच होत नसल्याची व्यथा मांडली. याच प्रमाणे प्रत्येक गावातील समस्यांचे निराकरण करण्याला आपले प्राधान्य असेल अशी ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिली.

 

दरम्यान, आज ठिकठिकाणी पक्ष प्रवेश पार पडले. यात खडदेवळा बुद्रुक येथे उपसरपंच नामदेव दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, राघव मोरे, आरीफ शेख, विजय पवार, मुश्ताक तडवी, भैय्या गायकवाड, गजानन सुकलाल तेली, धनलाल हिरामण तेली, तंटामुक्ती अध्यक्ष शेख नबाब शेख कालू, हितेश तेली, रवी देसले आदींनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. डोंगरगाव येथे सचिन विचारे, दादू सावळे, मनोज मनगरे, सागर लोखंडे, सचिन विजारे, भगवान पाटील, सागर विचारे, विनोद पवार, गोलू मोरे, राहूल विचारे, पिंटू पाटील, परमेश्वर विचारे, नाना तडवी आदींसह इतरांनी प्रवेश घेतला.

 

याप्रसंगी सारोळा बुद्रुक येथील सुभाष पाटील, अनिल पाटील, दीपक पाटील, पंकज पाटील, अनिरूध्द पाटील, आनंदा पाटील, रवींद्र पाटील, किरण पाटील, सागर पाटील आदींची उपस्थिती होती. वाघुलखेडा येथे ज्ञानेश्वर पाटील, हनुमंत पाटील, उत्तम पाटील, कृष्णराव पाटील, अजय पाटील, संदीप पाटील, राहूल बाविस्कर, वामन सोनवणे, भिका अहिरे, आदींसह अन्य यात्रेत सहभागी झालेत. खडकदेवळा बुद्रुक येथे कैलास तेली, रणजीत पाटील, आनंद गायकवाड, सचिन तेली, करण परदेशी, सतीश मोरे आदींसह अन्य यात्रेत सहभागी झालेत. तर, डोंगरगाव येथील नाना पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी पाटील, जितेंद्र सावळे, देविदास सावळे, रूपेश सावळे, पिंटू सावळे, संजय कोळी आदींची यात्रेत उपस्थिती होती.

 

या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, ॲड. अभय पाटील, गजू पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, प्रमोद पाटील, संदीप जैन, नामदेव चौधरी, योजना पाटील, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पांड्या, अरूण तांबे, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, जयश्री येवले, उषा परदेशी, बेबाबाई पाटील, निता भांडारकर, मनीषा पाटील, अरूण तांबे, आवेश खाटीक, नाना पाटील, विजय पाटील, बी.एन. पाटील, अण्णा भोई, विश्वास पाटील, संभाजी पाटील, भारत पाटील, प्रतिक पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.