महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संयुक्त कृती समितीचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश नुसार जळगाव परिमंडळ शाखेच्या वतीने निर्देशन

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संयुक्त कृती समितीचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश नुसार जळगाव परिमंडळ शाखेच्या वतीने आज दुपारी परिमंडळ कार्यालय जळगाव समोर

 

 

१.)वीज कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू करा

२.) तेरा जलविद्युत प्रकल्प खाजगीकरण करण्यात तीव्र विरोध

३.)महापारेषण कंपनीतील रुपये २०० कोटी चे वरील प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देण्यास तीव्र विरोध

४.) स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारच्या धोरण व सरकार करत असलेल्या अंमलबजावणीला विरोध

५.) कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करून ६० वर्षांपर्यंत रोजगाराची हमी देत टप्प्याटप्प्याने कायम करण्यात यावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे

या प्रमुख पाच जिव्हाळ्याचा मागणीसाठी क्रम बध्द आंदोलन पहिल्या टप्प्यात निषेध द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली.

कृती समितीचे वतीने कॉ.विरेंद्रसिंग पाटील संयुक्त सचिव वर्कर्स फेडरेशन, श्री पवन वाघुळदे सबॉर्डीनेट* *इंजिनिअर्स असोसिएशन,श्री सचिन पाटील वीज कामगार महासंघ, श्री विजय मराठे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना या सर्वांनी शासन व प्रशासन च्या कामगार विरोधी तसेच जनताभिमुख उद्योग खाजगीकरण धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला व आगामी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा व निर्धार केला आहे.

तसेच विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी सुध्दा सहभाग नोंदविला.

पुढील टप्प्यात दि.१९ सप्टेंबर रोजी निषेध द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत.प्रशासन व शासन सकारात्मक न झाल्यास दि २५ व २६ सप्टेंबर रोजी ४८ तासांचा संप पुकारला आहे.तरीही प्रशासन अनुकूल झाले नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर द्वार सभा यशस्वी होण्यासाठी कॉ.किशोर जगताप, कॉ.मुकेश बारी,कॉ.सचिन फड,कॉ.मंगेश बोरसे वर्कर्स फेडरेशन, श्री सुरेश सोनार, श्री ज्ञानेश्वर पाटील कामगार महासंघ , श्री आर आर सावकारे महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटना, श्री बरकत तडवी, श्री दिपक वंजारी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, श्री हेमंत खांडेकर, श्री दीपक भंगाळे सबॉर्डीनेट *इंजिनिअर्स असोसिएशन यांनी तसेच सर्व सहभागी संघटना सभासद पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

श्री मोहन गारूंगे वीज कामगार महासंघ यांनी सुत्रसंचलन तथा आभार प्रदर्शन केले.