पाचोरा रोटरी क्लब तर्फे स्कूल बस चालकांची मोफत नेत्र तपासणी

पाचोरा रोटरी क्लब तर्फे स्कूल बस चालकांची मोफत नेत्र तपासणी

 

पाचोरा : येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे तेजोदीप नेत्र रुग्णालय पाचोरा च्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्कूल बस चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी, तेजोदीप नेत्र रुग्णालय, स्टेशन रोड, पाचोरा येथे पाचोरा शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 120 स्कूल बस चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 

रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे आयोजित या नेत्र शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. पवनसिंग पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रोटरी क्लब सेक्रेटरी रो. प्रा. शिवाजी शिंदे, रो.डॉ.बाळकृष्ण पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रो. इंजि. गिरीश दुसाने, सर्वज्ञ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बिडकर, रो. चंद्रकांत लोढाया, रो. भरत सिनकर मंचावर उपस्थित होते.

 

या शिबिरात तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे संचालक सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी निर्मल इंटरनॅशनल स्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, वर्ल्ड स्कूल, सह अन्य सहयोगी शाळांमधील एकूण 120 वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी केली. याप्रसंगी बोलताना रो. बाळकृष्ण पाटील यांनी तेजोदीप रुग्णालयाच्या प्रगतीचा आलेख सादर केला. रो. डॉ. पवनसिंग पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन इंजि. गिरीश दुसाने यांनी केले, तर डॉ. गोरख महाजन यांनी आभार मानले.

 

या कार्यक्रमाला रो. रुपेश शिंदे, रो. गोरख महाजन, रो.श्रीमती अरुणा उदावंत , रो राजेश मोर, रो. प्रदीप पाटील, रो. निलेश कोटेचा, रो. डॉ. मुकेश तेली, रो. डॉ. तौसिफ खाटीक, रो. डॉ. अमोल जाधव, रो डॉ.अजय परदेशी, शैलेश तोतला, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोपाल पाटील, प्रथम पाटील, मीनाक्षी भावसार, ऋषिकेश पाटील, जगदीश महाजन व संतोष पूर्सणाणी यांनी परिश्रम घेतले.