“बताव क्या है सोना किधर है”असे म्हणत तिसगावातील मयत मच्छिंद्र ससाणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील हल्लेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

“बताव क्या है सोना किधर है”असे म्हणत तिसगावातील मयत मच्छिंद्र ससाणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील हल्लेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन /स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) चोरीच्या उद्देशाने” बताव क्या है,सोना किधर है”असे म्हणत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांच्या वर सहा सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. सहा सप्टेंबरच्या रात्री चोरीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिसगावातील मच्छिंद्र ससाणे यांच्या घरातील दरवाजांना कड्या लावून मच्छिंद्र ससाणे यांच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारले होते. आणि त्यांच्या चार कोंबडया चोरून नेल्या होत्या.याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी तिसगाव शहर बंद ठेवून गावातून निषेध मोर्चा काढून बाजार तळावरील महादेव मंदिरासमोर निषेध सभा घेतली होती. भाजपाचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी सरपंच जेष्ट नेते काशिनाथ पाटील लवांडे यांनी पोलिसांच्या कार्यपध्दती वर जोरदार टीका केली होती. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दहा दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळून जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. जर आरोपींना पकडले तर याच ठिकाणी तुमचा भव्य दिव्य सत्कार करू असे प्रतीआश्वासन शिवाजीराव कर्डिले यांनी पाथर्डी पोलिसांना जाहीर सभेत दिले होते. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तिन पथके तयार करून या तपासाला सुरुवात केली होती. या तिन पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस सब इनस्पेक्टर अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार राम माळी, संतोष लोंढे विश्वास बेरड,ज्ञानेश्वर शिंदे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख,संदीप दरंदले,शरद बुधवंत, राहूल सोळुंके, संतोष खैरे, भाउसाहेब काळे, अमोल कोतकर, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, प्रशांत राठोड, जालिंदर माने,बाळासाहेब खेडकर, प्रमोद जाधव,मयूर गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, महादेव भांड,आणि उमाकांत गावडे, अशांचे तिन पथके नेमुन या मच्छिंद्र ससाणे खुन प्रकरणातील तपासाला सुरुवात केली होती. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता हल्लेखोर हे तिन मोटारसायकल वरुन आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास पथकाने घटनास्थळा जवळपास चे अहमदनगर, मीरी, शेवगाव, पाथर्डी रस्त्यावरील सीसीटीव्हीती कँमेरे तपासून पाहिले असता सदर फुटेज मध्ये घटना घडली त्यावेळी तिन मोटारसायकल वरून दहा आरोपी पाथर्डीच्या दिशेने गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीसीटीव्ही मधील संशयित आरोपीचे फोटो गुप्त बातमीदाराला पाठवून गुन्हा करणाऱ्या आरोपी ची ओळख पटविण्यात आली होती.ओळख पटविण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की सदर गुन्ह्यातील आरोपी हे पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव परीसरातील वाकळेवस्ती वर आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठीच्या सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार पथकातील व्यक्तींनी वाकळेवस्ती येथे जाउन खात्री केली असता त्यांना एका पालाजवळ 8 ते10 जण बसल्याचे दिसले.पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयीत आरोपी हे पोलिसांना पाहून पळून जाउ लागले. पोलिसांनी अतिशय सावध पवित्रा घेत पाठलाग करून पळून जाणाऱ्या 6 आरोपींना शिताफीने रंगेहाथ पकडले. चौघेजण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे खरे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)उमेश रोशन भोसले, राहणार साकेगाव ता.पाथर्डी,2)दौलत शुकनाश्या काळे, राहणार माळीबाभुळगाव ता.पाथर्डी,3) सिसम वैभव काळे,राहणार माळीबाभुळगाव,4)शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, राहणार साकेगाव, ता.पाथर्डी,5)आकाश उर्फ फैय्याज शेरू उर्फ लोल्या काळे,माळीबाभुळगाव,ता.पाथर्डी,6)विधीसंघर्षीत बालक वय वर्षे14असे सांगितले. त्यांच्या कडे वरील गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 7)सेशन उर्फ बल्लू रायभान भोसले, राहणार साकेगाव, ता.पाथर्डी(फरार),8)बेऱ्या रायभान भोसले राहणार साकेगाव, ता.पाथर्डी,(फरार),9)आज्या उर्फ बेडरूल सुरेश भोसले, राहणार ,फुंदे टाकळी फाटा ता.पाथर्डी(फरार),10)लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे, माळीबाभुळगाव,ता. पाथर्डी,(फरार),यांच्या सह हा गुन्हा केल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी करून विचारले असता त्यांनी त्यांचे ईतर साथीदार हे मोटारसायकल वर जाउन एकांतातील वस्तीची पाहणी करून शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लाउन ज्या घरात वयोवृद्ध लोक झोपलेले आहेत प्रथम त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील दागिने हिसकावून घेत असल्याबाबत माहिती दिली. तसेच घटनेच्यावेळी आपले मोबाईल बंद ठेवून आपला कार्यभाग उरकित होते. अशा प्रकारे त्यांनी शेतातील असणाऱ्या वस्तीचे घराचे दरवाजे तोडून, रस्ता अडवून शेवगाव तालुक्यातील घोटण, शेकटे, बोधेगाव या ठिकाणी,तर पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव,जांभळी, सोमठाणे, शेकटे, तिसगाव ,सुसरे, महिंदा, तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगाव, आणि बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. आता ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 844/2024,भारतीय न्याय संहिता कलम 103(1),309(6),331(8),127(2),या गुन्ह्याच्या तपासाकामी,पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. पुढील तपासाकामी पाथर्डी पोलिसांनी त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या वर या पुर्वीही पोलीस स्टेशनला अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.आरोपी नामे नामदेव उमेश रोशन भोसले, हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरोधात खुन ,दरोडा, जबरी चोरी, अशा स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल आहेत.सिसम वैभव काळे याच्यावर दरोड्याचे 3 गुन्हे दाखल आहेत. दौलत सुकनाश्या काळे याच्या वर घरफोडीचे 3 गुन्हे दाखल आहेत.लोल्या उर्फ शेरू शुकनाश्या काळे याच्यावर घरफोडीचे 4 गुन्हे दाखल आहेत. बाऱ्या उर्फ किशोर रायभान भोसले याच्यावर जबरी चोरी व दरोड्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांतजी खैरे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील साहेब, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. शेवगाव पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालून सर्व सामान्य जनतेला हैराण करून सोडणाऱ्या या हैवाणी संशयित गुन्हेगारांना पकडल्या मुळे अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांची मान आणि शान उंचावली आहे. तिसगावातील पोलीस चौकीत कायम स्वरूपी दोन पोलीस नेमुन दोन नंबरचे धंदे बंद करावेत अशी मागणी तिसगावचे जेष्ठ नेते आणि माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी जाहीर सभेत केली आहे. तिसगावातील व्यापाऱ्यांनी गाव बंद करून तीव्र आंदोलन केल्यानंतर चोवीस तासाच्या आतच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. “कानुन के हात बहोत लंबे होते है ” हे जनतेला दाखवून दिल्यामुळे जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरी चा आलेख उंचावला आहे. पाथर्डी पोलिसांच्या कार्यपद्धती वर तिसगावच्या जाहीर निषेध सभेत काही नेत्यांनी चांगलेच ताषेरे ओढले होते त्याला पोलिसांनी हा तपास लावून सडेतोड उत्तर दिले आहे.