माझी शाळा…सुंदर शाळा श्री.गो.से. हायस्कूल प्रगतीच्या यशोशिखराव. माझी शाळा सुंदर शाळा

माझी शाळा…सुंदर शाळा श्री.गो.से. हायस्कूल प्रगतीच्या यशोशिखराव. माझी शाळा सुंदर शाळा

 

 

 

पाचोरा प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नामांकित शाळा श्री. गो.से.हायस्कूल. शैक्षणिक क्षेत्रात पिढ्यान पिढ्या घडविण्यात आमची शाळा सदैव अग्रेसर राहिली आहे. शहरातील सर्वात जुनी व गौरवशाली इतिहास प्राप्त असलेली जिल्ह्यातील नामांकित शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे. पाचोरा शहरात सर्वात मोठी व सर्वात जास्त विद्यार्थी संख्या हे आमचं वैभव आहे.

चित्रात दाखविल्याप्रमाणे आमच्या शाळेचा सर्वागीण प्रगतीचा आलेख हा सदैव उंचावत राहिला आहै. चित्रातील विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या क्रियेतून आमची गती दिसत आहे. शाळेच्या केलेल्या रेखांकनाच्या सर्वत्र घडलेली पिढी प्रतीकात्मक चित्रांच्या रुपात काढलेली दिसून येत आहे. डॉक्टर,इंजिनियर,वकील,आर्टिस्ट, वैज्ञानिक ,खेळाडू,कम्प्युटर तज्ञ, गायक, अशा विविध क्षेत्रातून सन-१९३६ पासून विद्यार्थी घडत आहेत . या सोबतच संस्कारांची मूल्य जोपासणारे विद्यार्थी आणि देशाचा उत्तम व सुसंस्कारी नागरिक घडविणे ही आमच्या शाळेची भक्कम बाजू आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानूनच शाळेचा प्रत्येक घटक त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतो.

अशी ही

माझी शाळा…. सुंदर शाळा!**पाचोरा ता.सह.शिक्षण संस्था संचलित

श्री.गो.से.हायस्कूल ,पाचोरा यासाठी मुख्याध्यापक नरेंद्र पाटील उपमुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक एबी आहे अंजली गोहिल सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेआहे.