आ. सत्यजीत तांबेंनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने घेतली विद्यार्थ्यांची शिकवणी

आ. सत्यजीत तांबेंनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने घेतली विद्यार्थ्यांची शिकवणी

– शिक्षकदिना निमित्त राबवला अनोखा उपक्रम

 

प्रतिनिधी ,

 

शाळा म्हटल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र शिक्षकदिनाच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवले. आमदार सत्यजीत तांबे स्वतः त्यांच्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने वर्गातील विद्यार्थी देखील अतिशय उत्साहाने त्यात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आमदार तांबे यांना विविध प्रश्न देखील विचारले.

 

गुरुवारी, शिक्षकदिनाचे औचित्य साधून आ. सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वतः शिकलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार आ. तांबे यांनी शिक्षकांच्या मदतीने मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचे तास घेत विद्यार्थ्यांना शिकवले. वर्गात उपस्थित मुलांना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलेच, शिवाय त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.

 

आमदार सत्यजीत तांबेंनी यावेळी विद्यार्थांना मराठीतील स.ग. पाचपोळ यांची हंबरून वासराले ही कविता शिकवली. या कवितेतून आई आणि मुलाचे नाते कसे असते हे समजावून सांगितले. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषा किती महत्त्वाची आहे. कामाच्या ठिकाणी व प्रदेशात गेलेल्यावर इंग्रजी भाषा येणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थांना सांगितले. त्याचबरोबर डिजिटल बोर्डच्या माध्यमातून गणिताचे धडेही विद्यार्थांना शिकवले. या वेळी त्यांच्यासमवेत शाळेतील शिक्षक देखील उपस्थित होते.

 

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान असते. शिक्षक हे नवी पिढी घडवत असतात. त्यांचे काम सोपे नसते. मुलांना शिकवणे आणि त्यांना कठीण काम आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे शिक्षकदिनी त्यांना वंदन करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे आ. सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले.

 

*द लाईन शहाराविषय विद्यार्थांना दिली माहिती.*

 

विद्यार्थ्यांना शिकवत असताना डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आ. सत्यजीत तांबे यांनी सौदी अरबमध्ये तयार होत असलेल्या लाईन शहरविषय माहिती दिली. या शहराचा विस्तार आडवा नाही तर उभा, आकाशाच्या दिशेने होणार आहे. यातून भूमिती शिकताना लाईनचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले.