के सी इ च्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक दिन उत्सहात साजरा

के सी इ च्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक दिन उत्सहात साजरा

 

भारतीय संस्कृती गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना खूप महत्त्व देते. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन केवळ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतात तर शिक्षकांच्या समर्पण आणि मेहनतीचाही सन्मान करतो. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी त्यांची कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते. तर शिक्षकांना आत्मनिरीक्षण करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते. अशाप्रकारे शिक्षक दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे.राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून कसा साजरा होऊ लागला. याची कथा त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीच्या आदराचा पुरावा आहे. 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी हा दिवस शिक्षकांना समर्पित करावा, अशी सूचना त्यांनी केली. अशा प्रकारे ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

या प्रसंगी भारत रत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी पूजन केले. त्यावेळेला महाविद्यलयाचे अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार ,सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. या वर्षी महाविद्यालयात ‘फ्लिप द स्क्रिप्ट’ या अंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे कामकाज पाहिले. प्राचार्य पासून ते ग्रंथपाल पर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका साकारलयात . विद्यर्थ्यांनी नेहमीच्या पद्धतीने वर्गात जाऊन विषय शिकविले, त्यात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून मयूर व्यास ,उप प्राचार्य निखिल पाटील ,अकॅडमिक डीन जान्हवी दैवज्ञ ,रजिस्ट्रार कृष्ण पाटील ,संगणक विभाग प्रमुख श्वेता चौधरी ,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख मयूर फुलपगार ,इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग प्रमुख साक्षी करोले ,डेटा साईन्स विभाग प्रमुख दीपाली श्रीवास्तव ,मेकॅनिकल विभाग प्रमुख लोकेश खडके,प्रथम वर्ष विभाग प्रमुख शुभम शिंदे ,व्यवस्थापन विभाग प्रमुख मनीषा बारी,ग्रंथपाल मयूर पाटील ,शारीरिक निर्देशक पियुष चौधरी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख जय सरोदे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने काम पाहिले.