चोपडा महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी’ विषयावर व्याख्यान संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी’ विषयावर व्याख्यान संपन्न

 

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ. दादासाहेब सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा आणि द युनिक अकॅडमी पुणे, शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘एक दिवशीय पदवी काळात MPSC /UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी?’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून कला शाखेचे नवनियुक्त उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, प्रमुख वक्ते म्हणून विकास गिरासे, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, नरेंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाडांना पाणी देऊन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ.आर.आर.पाटील यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास गिरासे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा मुलाखत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी असणारी मानसिकता, वेळेचे नियोजन, संयम, सकारात्मक दृष्टिकोन विविध यशस्वी व्यक्तींचे अनुभव व संघर्ष विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ‘आपण जिद्दीने, मेहनतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो’ असा आशावाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. ए. बी सूर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र याचा परिपूर्ण उपयोग करून द्यावा, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे करिअर म्हणून बघावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.बी. एच.देवरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सौ.एम.टी शिंदे, डॉ. डी. पी. सपकाळे, डॉ. डी. एस. पाटील, डॉ. डी. डी. कर्दपवार, करिअर कट्टा समन्वयक वाय. एन. पाटील, एस. बी. देवरे, गोपाल बडगुजर, चि.घनश्याम माळी, चि.विजय नागदेव यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.