प्रियकराला चटावलेल्या बायकोने नवऱ्याच्या काढला काटा,हाती काहीच धागेदोरे नसताना, तपासात नेवासा पोलिसांचा सींहाचा वाटा
(सुनिल नजन/ “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा) जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्रिया वटपौर्णिमेला (वटवृक्ष) वडाची पुजा करतात आणि आपला पतीप्रेमा विषयीचा आदर व्यक्त करतात. अहमदनगर जिल्ह्यात मात्र पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी वेगळीच घटना घडली.प्रियकराच्या प्रेमाला चटावलेल्या बायकोने नवऱ्याचा काढला काटा ,हाती काहीही धागेदोरे नसताना तपासात मात्र नेवासा पोलीसांचा सींहाचा वाटा आहे. या बाबदची घटना अशी की 16 आँगष्ट 2024रोजी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात शिवाजीराव पवार मेडिकल काँलेज जवळ शेत गट क्र.207 मध्ये एका अनोळखी ईसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची घटना घडली होती.या बाबद पुनतगावचे पोलिस पाटील संजय लक्ष्मण वाकचौरे यांनी नेवासा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 772/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)138 प्रमाणे अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्याचा तपास उघड करण्यासाठी अहमदनगर च्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, आणि नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना आदेश दिले होते. मग स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संदिप दरंदले,अम्रुत आढाव,प्रमोद जाधव,रोहित येमूल,बाळासाहेब खेडकर, शरद बुधवंत, संतोष खैरे,फुरकान शेख,प्रशांत राठोड, अरूण मोरे, भाग्यश्री भिटे,यांचे एक पथक आणि नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजू केदार, अरुण गांगुर्डे, अप्पा तांबे, नारायण डमाळे, नुकतेच पाथर्डीहुन बदलून आलेले अमोल कर्डिले,गणेश फाटक,सुमित करंजकर, गणेश जाधव यांचे एक पथक तयार करून सदर दोन्ही पथकांना मार्गदर्शक सुचना देऊन तपासासाठी तैनात केले होते.सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडला त्या ठिकाणी जाउन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आजूबाजूच्या परीसरातील लोकांना मयताविषयी माहिती देऊन ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केला.परंतु सदर मयताची ओळख काही पटली नाही.सदर मयत हा बाहेरच्या जिल्ह्यातील असावा म्हणून महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनला मयताविषयी माहिती कळविण्यात आली होती.सर्व हाँटसाप ग्रुपमध्ये मयताचे फोटो व्हायरल केले होते.परंतु कोठेही काहीच धागेदोरे मिळाले नाही.तपास करणाऱ्या दोन्ही पथकानी घटनास्थळा पासून श्रीरामपूर आणि नेवाशाकडे जाणाऱ्या रोडवरील सर्व ठिकाणचे सलग सात दिवसाचे सीसीटीव्हीतील फुटेज तपासले असता फुटेजमध्ये घटनास्थळाच्या आजूबाजूला रेनाल्ट ट्रिबरगाडी संशयित रित्या फिरताना आढळली.सदर गाडीच्या मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही आंबादास भानुदास म्हस्के राहणार रमाई नगर,जुना जालना,मोतीबाग जवळ,तालुका जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली.सदर गाडी मालकाचा शोध घेतला असता गेल्या वीस दिवसापासून त्याचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळाली.त्या नंतर त्याची पत्नी मिना आंबादास म्हस्के हीची माहिती काढली असता ती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी या गावात भाडोत्री खोली घेऊन रहात असल्याची माहिती मिळाली.दिनांक 29 आँगष्ट रोजी लोणी ता.इंदापूर येथेमिना म्हस्के हिचा शोध घेत असताना ती एका ईसमासोबत तेथे मिळून आली.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १)मिना आंबादास म्हस्के वय (36वर्षे) राहणार रमाई नगर,जुना जालना, मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना , २)लहू शिवाजी डमरे वय (31वर्षे) राहणार ढोकसळ तालुका बदनापूर, जिल्हा जालना,असे असल्याचे सांगितले.पोलिसांनी सदर गुन्ह्याबाबद त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता लहू डमरे यांनीसांगितले की मिना आंबादास म्हस्के हीच्यासोबत माझे प्रेम संबंध असुन तीचा मयत पती आंबादास भानुदास म्हस्के, राहणार रमाई नगर, जुना जालना,मोतीबागेजवळ,ता.जिल्हा जालना हा तीला चारित्र्याच्या संशयावरून नेहमी त्रास देत असल्याने त्याला आम्ही पुणे या ठिकाणी कामासाठी जायचे आहे असे सांगून त्यास रेनाल्ट ट्रिबर गाडीमध्ये घेऊन येउन रात्रीच्यावेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यावर त्याचा गळा कापला व तेथून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली.सदर संशयित आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब,आणि श्रीरामपूर चे अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलूबर्मे साहेब,शेवगावचे पोलीस उपअधिक्षक सुनिल पाटील यांच्या सुचना आणि मार्गदर्शना खाली केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक पथक थेट मध्यप्रदेशातील उजैन येथेही गेले होते. कारण मयताच्या हातावर महादेवाचे चित्र गोंदलेले होते.आणि त्यामध्ये कालभैरव ही अक्षरे लिहलेली होती म्हणून पोलिसांना वाटले हा उजैन येथील परप्रांतीय असावा म्हणून तेथेही तपास केला होता.तपासासाठी नेवासा पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर,पुणे, नाशिक,बीड,जालना,या ठिकाणी जाउन पोलिसांनी तपास केला. पोलिसापुढे या तपासाचे फार मोठे आव्हान होते. परंतु हाती काहीही धागेदोरे नसताना गुन्ह्याचा तपास लावून “कानून के हात बहोत लंबे होते है” हे नेवासा पोलीसांनी दाखवून दिले आहे. या तपासात नेवासा पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे.सदर आरोपींना नेवासा न्यायालया समोर हजर केले असता त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी दिली आहे.पती पत्नीच्या पवित्र नात्याला या घटनेने काळिमा फासला गेला आहे.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला ही अतिशय उच्च शिक्षित आहे. ही माहिती मिळाली आहे.” शिकले तितके हुकले” हे म्हणण्याची वेळ आता आली आहे.