तिसगावच्या ओम गँस एजन्सी कडून तुम्हाला गँस आला आहे असे खोटे सांगून २४०० रुपयांची फसवणूक झाल्याची ग्राहकाची ओम एजन्सीकडे तक्रार 

तिसगावच्या ओम गँस एजन्सी कडून तुम्हाला गँस आला आहे असे खोटे सांगून २४०० रुपयांची फसवणूक झाल्याची ग्राहकाची ओम एजन्सीकडे तक्रार

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/ स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) तुम्हाला तिसगावच्या गँस एजन्सी कडून गँस कनेक्शन मंजूर झाले आहे.सकाळी नउ वाजता तुमच्या गावात गँस घेऊन गाडी येणार आहे.दोन हजार चारशे रुपये लगेच भरा मी तिसगावचा शिंदे आहे. असे खोटे सांगत 2400 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार तिसगावच्या ओम गँस एजन्सी कडे करण्यात आली आहे. या बाबदची घटना अशी की युवराज प्रकाश गजरे राहणार भेंडे बु.तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असे फसवणूक करणाऱ्या या ठकसेनाचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथील भगवान रामभाऊ नरवडे यांच्या घरी गुरुवार दि. 29/8 2024 रोजी सकाळी आठ वाजता युवराज प्रकाश गजरे हा गेला. मी तिसगावच्या ओम गँस एजन्सी कडून आलो आहे. माझे नाव शिंदे आहे. तुम्हाला तिसगावच्या ओम गँस एजन्सी मध्ये दोन टाक्या सह गँसकनेक्शन मंजूर झाले आहे.सकाळी नउ वाजता तुमच्या गावात गँसची गाडी येणार आहे. ताबडतोब दोन हजार चारशे रुपये भरा असे सांगून युवराज प्रकाश गजरे, राहणार भेंडे,तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर मो.नं.8805226366 हा भगवान नरवडे राहणार राघोहिवरे यांच्या कडून गँस कनेक्शनच्या नावाखाली दोन हजार चारशे रुपये घेऊन पसार झाला आहे. गावात गँसची गाडी कशी आली नाही म्हणून भगवान रामभाउ नरवडे हे तिसगावच्या ओम गँस एजन्सीच्या अधिक्रुत कार्यालया मध्ये गेले असता त्यांना आमच्या एजन्सीकडे अशा प्रकारे तुमच्या नावाने कोणत्याही प्रकारचा गँस मंजूर झाला नसल्याचे ओम एजन्सीच्या संचालिका सौ.उषाताई कराळे यांनी सांगितले. मग भगवान रामभाऊ नरवडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. युवराज प्रकाश गजरे राहणार भेंडे, तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर याने गँस कनेक्शनच्या नावाखाली शेवगाव, पाथर्डी, नेवासा, आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका या चार तालुक्यातील अनेक गावात धुमाकूळ घातला असुन गँसच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक केली असल्याची माहिती वरील तालुक्यातील नागरिक सांगत आहेत. ओम गँस एजन्सीच्या नावाखाली अनेक गावात अनेक भामटे लोकांना फसवत आहेत. युवराज प्रकाश गजरे हा वेगवेगळ्या गावात गेल्यावर स्वतःचे नाव कधी प्रकाश पोपट गजरे,कधी अर्जुन सुदाम गजरे ,तर कधी अनिकेत राजेंद्र गजरे, किंवा शिंदे आणि खंडागळे अशी वेगवेगळी नावे सांगून सर्व सामांन्य ग्राहकाची फसवणूक करीत आहेत. तुम्हाला गँस मंजूर झाला आहे. आणि एवढी एवढी रक्कम द्या असे पाथर्डी तालुक्यातील गावात कोणी तुम्हाला सांगितल्यास संबंधीत व्यक्तींनी थेट तिसगाव तालुका पाथर्डी येथील ओम गँस एजन्सीच्या संचालिका सौ.उषाताई कराळे यांच्याशी 9423001538 या नंबरवर ताबडतोब संपर्क साधावा असे आवाहन ओम गँस एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व सामांन्य नागरीकांनी गँस एजन्सीजने नेमून दिलेल्या गँसपाँईंट मधून च गँस टाक्या भरून घेतल्या पाहिजेत असे सांगून प्रत्येक गँस ग्राहकाने आपल्या गँसची 31आँगष्ट अखेर केवायसी करून घेणे बंधनकारक आहे .जे ग्राहक केवायसी करणार नाहीत त्या केवायसी न केलेल्या गँसग्राहकांना नंतर गँस भरून दिला जाणार नसल्याचे ओम गँस एजन्सीच्या संचालिका सौ.उषाताई कराळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तसेच वरील भामट्यापासुन नागरिकांनी सतर्क रहावे असेही आवाहन ओम गँस एजन्सीचे व्यवस्थापक सुशांत कराळे यांनी सांगितले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी या भामट्याचा बंदोबस्त करावा अशी फसवणूक झालेल्या नागरिकांची मागणी आहे.