चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा 

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल-टेनिस, बॅडमिंटन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एस.पाडवी यांनी क्रीडा साहित्याचे पूजन केले. यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पिकलबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू कु.अंजली भूपेंद्र पोळ व जिनिषा संदेश क्षीरसागर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीश सोनवणे हेही उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख व क्रीडा संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्री. रवींद्र पाटील व श्री सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.