क्रिप्टोकरन्सी मध्ये आधुनिक जगाचे चलन होण्याची क्षमता – प्रा. विशाल हौसे 

क्रिप्टोकरन्सी मध्ये आधुनिक जगाचे चलन होण्याची क्षमता – प्रा. विशाल हौसे

 

 

धरणगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात अर्थ वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. ए.डी. वळवी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विशाल हौसे उपस्थित होते. प्रा. विशाल हौसे यांनी विद्यार्थ्यांना एकूणच अर्थव्यवस्थेत चलन कसे उदयास आले, आता फिनटेक करन्सी , क्रिप्टो करन्सी कशी वापरली जात आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली. क्रिप्टो करन्सी आधुनिक तंत्रज्ञानावर आधरित असले तरी त्यात सुधारणेला अजूनही संधी आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पण सध्या एकूणच क्रिप्टो करन्सी मध्ये फार वाढ होत असल्याने असे नियंत्रण अवघड होत आहे. प्रा. हौसे यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये क्रिप्टो करन्सी आणि त्याबाबत जागरूकता निर्माण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ए.डी. वळवी यांनी अर्थशास्त्र कसे प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडते याबद्दल विविध उदाहरणे देऊन मागदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. व्ही.ए.वारडे यांनी महाविद्यालयातील अर्थ वाणिज्य मंडळाने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थिताना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन तर आभार डॉ. हर्षवर्धन भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्योती महाजन , प्रा. प्रशांत क्षत्रिय यांनी सहकार्य केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी , कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अर्थशास्त्र वाणिज्य विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.