नार-पारच्या लढ्यात वैशालीताई सुर्यवंशी यांची उडी

  1. नार-पारच्या लढ्यात वैशालीताई सुर्यवंशी यांची उडी

उन्मेषदादा पाटील यांच्या आंदोलनात सहभाग

 

*चाळीसगाव, दिनांक २४ (प्रतिनिधी )* : नार-पार प्रकल्पासाठी माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेल्या आंदोलनास शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाठींबा देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली.

 

राज्य सरकारने नार-पार प्रकल्पाला मंजुरी देण्याचा आव आणला असला तरी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी आधीच हा प्रोजेक्ट रद्द केल्याची घोषणा करून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला विरोध म्हणून माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी कालपासून आज सायंकाळपर्यंत थेट गिरणा नदीच्या पात्रात आंदोलन सुरू केले. ते काल रात्रभर गिरणा नदीच्याच पात्रात उभे होते. तर आज सकाळपासून त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले.

 

शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज उन्मेषदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविला. याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या की, नार-पार प्रकल्प पूर्ण झाल्यास चाळीसगाव व पाचोरा-भडगाव या दोन्ही मतदारसंघाला लाभ होणार आहे. यामुळे गिरणाकाठ समृध्द होणार असल्याने पंतप्रधान मोदीजी यांनी याला मंजुरी प्रदान करावी अशी मागणी वैशालीताई सुर्यवंशी यांनी केली.

 

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी खासदार उन्मेषदादा पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, संपदाताई पाटील, अभय पाटील, उध्दव मराठे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.