स्व.सौ.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

स्व.सौ.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने स्व.सौ.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील एकूण ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा राजळे महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला. दि.२० ते २२ या तिन दिवसात स्मृती व्याख्यान मालेचेही आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर, संगमनेर येथील भाउसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील, आणि भारतीय क्रुषक समाजाचे प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब भोसले यांचीही व्याख्याने झाली. स्व.दादापाटील राजळे, स्व.चंद्र भागाबाई राजळे आणि स्व.राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकिसन काकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.प्रारंभी प्राचार्य राजधर टेमकर सर यांनी प्रास्ताविक केले.गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शाल,स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र,बुके देऊन सन्मानित करण्यात आले.आमदार राजळे यांनी गुणवंतांचे अभिनंदन करून आपले मनोगत व्यक्त केले.बापुसाहेब भोसले यांनी जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला.या सोहळ्याचा पसायदानाने समारोप करण्यात आला.या प्रसंगी डॉ विनायक हाडके, जालिंदर पवार, महाजन साहेब, सुभाष ताठे,सुभाष बुधवंत,भिमराज सागडे,कुशिनाथ बर्डे, भास्कर गोरे,राहुल राजळे, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, अर्जुनआबा राजळे, लक्ष्मण काशिद, राजेंद्र मतकर सर,ग्रामसेवक नारायण नजन, क्रुष्णा राजीव राजळे, दत्तात्रय भगत,रामदास म्हस्के सर ,विक्रम राजळे सर यांच्या सह अनेक विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेंद्र इंगळे सर आणि निर्मलाताई काकडे मँडम यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बाबासाहेब चोथे सर यांनी मानले. प्रितीभोजनाने या व्याख्यानमाला आणि जयंती सोहळ्याची सांगता झाली.