वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले खा. संजय राऊत यांचे स्वागत

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले खा. संजय राऊत यांचे स्वागत

 

*जळगाव, दिनांक 21 (प्रतिनिधी )* : जळगाव जिल्हा दौऱ्यासाठी दाखल झालेले खासदार संजय राऊत यांचे आज वैशालीताई सुर्यवंशी यांनी जळगाव विमानतळावर स्वागत केले.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पक्षबांधणीच्या दृष्टीने मेळाव्यांना संबोधित करण्यासाठी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून दुपारी विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

 

याप्रसंगी पक्षाच्या नेत्या तथा पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी खासदार संजय राऊत यांचे जळगाव विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या सोबत पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, गजू पाटील आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.