पांडवकालीन मल्लिकार्जुनेश्वर पुजा महोत्सवा निमित्त घोटन येथे कुस्त्यांचा जंगी हंगामा संपन्न 

पांडवकालीन मल्लिकार्जुनेश्वर पुजा महोत्सवा निमित्त घोटन येथे कुस्त्यांचा जंगी हंगामा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) महाभारतातील अर्जुनाने ज्या ठिकाणी गोठे बांधून गायांचा सांभाळ केला त्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथे आजही मल्लिकार्जुनेश्वर मंदिर मोठ्या थाटात उभे आहे.या मंदिराला मोठा पौराणिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील नामवंत पैलवान निर्माण करण्यासाठीची मोठी परंपरा या गावाला लाभलेली आहे. पैलवानांचे माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात घोटन हे गाव प्रसिद्ध आहे. पैलवानांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आजही या गावात अनेक घरात पैलवान निर्माण करण्यासाठी गावचे जेष्ठ वस्ताद पैलवान दामूआण्णा घुगे यांचा सींहाचा वाटा आहे. कुस्ती या खेळातील खेळाडू हा देशपातळीवर झळकला पाहिजे हीच दामूआण्णाची संकल्पना आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या ठिकाणी येउन कुस्ती खेळातील आपले डावपेच दाखवून कुस्त्यांच्या जंगी हंगाम्यात सहभागी होतात. दुरवरून आलेला पैलवान जरी कुस्ती खेळला नाही तरी त्याला परत घरी जाण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो ही या गावाची खास खासियत आहे.अनेक गावातील महिला खेळाडू ही येथे येउन आपली हजेरी लावतात. येथे प्राचीन काळापासून या मल्लिकार्जुनेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांच्या नवसाला पावणारा महादेव म्हणून हा मल्लिकार्जुनेश्वर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. आजही नवसाला पावणारे भाविक श्रावणातील तिसऱ्या सोमवारी दुरड्या भरून या महादेवाला फक्त पेढ्यांचा महानैवेद्य वाजत गाजत अर्पण करतात. शासनाच्या पुरातत्व खात्याने हे मंदिर ताब्यात घेतले असून तेथे अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरातत्व खात्याचे अधिकारी राजेंद्र डगलस साहेब हे येथे स्वतंत्र देखभाल करतात.तर पुजारी गुरव म्हणून रवी शिंदे हे थेट गाभाऱ्यात जाउन महादेवाची महासेवा करतात. ह.भ.प.महादेव महाराज घुगे हेही गावातील भाविकांना ज्योतिष शास्त्राचे धडे देउन त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. हा नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यासाठी जेष्ठ पैलवान दामूआण्णा घुगे, संजय मोटकर,संदिपजी मोटकर, सर्जेराव ढाकणे, मुरलीधर थोरे,विठ्ठल मोटकर, शहादेव घुगे, नामदेव घुगे,विष्णू घुगे,सचिन घुगे, आदेश घुगे,प्रकाश घुगे, देविदास घुगे, रेवननाथ भोसले, रणजित घुगे, कुंडलिक घुगे यांनी विषेश परीश्रम घेतले.या गावात वर्षातून तिन वेळेला कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यात येतो.