प्रि वेडींग करणार नसेल तरच मी लग्न करणार अशी प्रतिज्ञा घ्या,प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांचा राजळे स्मृती व्याख्यानमालेत विद्यार्थीनींना सल्ला

प्रि वेडींग करणार नसेल तरच मी लग्न करणार अशी प्रतिज्ञा घ्या,प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांचा राजळे स्मृती व्याख्यानमालेत विद्यार्थीनींना सल्ल

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) वास्तव आणि आभासी जगात वाहत जाउ नका. खोट्या प्रोफाइल वर विश्वास ठेवूनका.जगात सर्वात सुंदर आपले आई वडील आहेत ते कधीच आपल्याला फसवनार नाहीत. कला हे आयुष्यातील हरीतद्रव्य आहे. आजची शिक्षण व्यवस्था ही भलतीकडेच गुरफटली आहे. पुरुषांचे सौंदर्य हे त्याच्या कर्तुत्वात असते. महाराज हे दिसण्यात नाहीत तर ते असण्यात पाहिजेत.प्रेम हे उदात्त असले पाहिजे. प्रिवेडींग करणार नसेल तरच मी लग्न करणार असे पहायला आलेल्या नवऱ्या मुलाला ठणकावून सांगा अशी शफथ घ्या असा सल्ला गुरुजीच्या नात्याने प्रसिद्ध साहित्यिक प्रा.संजय कळमकर यांनी राजळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यीनींना दिला.ते स्व.दादापाटील राजळे स्मृती व्याख्यान मालेचे पहीले पुष्प गुंफताना “आनंदी जिवनातील वाटा” या विषयांवर संदेश देताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकिसन काकडे हे होते. कळमकर यांनी प्रथम स्व. दादापाटील राजळे यांच्या समाधी स्थळावर जाउन पुष्पचक्र अर्पण केले.आणि पुष्पांजली अर्पण केली. दिप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्राचार्य राजधर टेमकर सर यांनी महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्या समवेत सुभाषराव ताठे,जे.आर.पवार, रामदास म्हस्के सर,शरद साखरे सर,सदाशिव तुपे, विक्रमराव राजळे,कुशिनाथ बर्डे, क्रुष्णा राजीव राजळे,हे आवर्जून उपस्थित होते. संजय कळमकर यांनी मोबाईल पासून दुर व्हा,वाचनाकडे लक्ष द्या. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखली पाहिजे.असे सांगत विद्यार्थ्यांना आपल्या खुमासदार शैलीत विनोद करीत पोटधरून खळखळून हसायला लावून मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी राहुल राजळे, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले,भास्कर गोरे, योसेफ तिजोरे, सोपान तुपे, दत्तात्रय भगत,पाटील सर,प्रदिप देशमुख सर अशोक काळे,सुनिल पानखडे सर यांच्या सह सर्व राजळे महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. व्याख्याना नंतर कळमकर सर यांनी नवीन लँबरोटरीला भेट दिली. सूत्रसंचालन राजेंद्र इंगळे सर यांनी तर आभार रोहित आदलिंग सर यांनी मानले. प्रा.निर्मला काकडे यांनी महीला प्रतिनिधींचे स्वागत केले. स्व.दादा पाटील राजळे महाविद्यालयातील व्याख्यान मालेचे हे १९वे वर्षे आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना ही एक पर्वणीच असते.