भडगावात रंगला सामूहिक रक्षाबंधन सोहळा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत हजारो भावांचे पाठबळ

भडगावात रंगला सामूहिक रक्षाबंधन सोहळा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत हजारो भावांचे पाठबळ

 

भडगाव, दिनांक १९ (प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहरातील नारायण मंगल कार्यालयात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सामूहिक रक्षाबंधन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याला हजारोंची गर्दी उसळली. यात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य बंधू-भगिनींचा मोठ्या संख्येने समावेश होता. याप्रसंगी उपस्थित बांधवांनी वैशालीताई सुर्यवंशी यांना राखी बांधून आपण त्यांच्या परिवर्तनाच्या लढाईत सोबत उभे असल्याची ग्वाही दिली.

 

वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून आपण सर्वांचे प्रेम पाहून भारावून गेलो असून हा स्नेहबंध कायम राहिल असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. रक्षा बंधन सोहळा दरम्यान भडगांव पेठ व पठाणवाडा तसेच शहर व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कृषी कन्या वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वात ठेऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

 

या कार्यक्रमाला वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह गणेशअण्णा परदेशी, दीपक जिभाऊ पाटील, मनोहरदादा चौधरी, शंकरआप्पा मारवाडी, योजनाताई पाटील, सुषमाताई भावसार, रीनाताई पाटील, सविताताई चौधरी, रेखाताई शिरसाठ, पुष्पाताई परदेशी, पप्पू दादा पाटील, रतन भाऊ परदेशी, मच्छिंद्र आबा पाटील, जे. के. पाटील, गोरख दादा पाटील, सुरेश काका पवार, राजेंद्र मोरे, इसाक मलिक, भिकणुर पठाण, सुभाष पाटील, राजू देशमुख, डी. डी.पाटील, महेश शिंदे, पृथ्वीराज पाटील. शामकांत महाजन, शिवाआप्पा महाजन, सुनील भाऊ महाजन, माधव जगताप, चेतन पाटील, यश पाटील, गायत्रीताई बिरारी, उषाताई परदेशी, सुवर्णाताई पाटील, सुरेखाताई वाघ, निताताई भांडारकर कल्पनाताई पाटील, सरीताताई पाटील, मनीषाताई पाटील, मीनाक्षीताई पाटील तसेच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.