वैशालीताई सुर्यवंशींनी घेतली खा. सुप्रिया सुळेंची भेट 

वैशालीताई सुर्यवंशींनी घेतली खा. सुप्रिया सुळेंची भेट

 

पारोळा, दिनांक १७ (प्रतिनिधी ) : पक्षाच्या मेळाव्यानिमित्त येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची वैशालीताई सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

 

माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांच्या निवासस्थानी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत विजयाबद्दल त्यांनी सुप्रियाताईंचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. तसेच याप्रसंगी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रियाताईंसोबत चर्चा केली.

 

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, योजनाताई पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.