आदिवासी सप्ताहातील कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

आदिवासी सप्ताहातील कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

 

पाचोरा, दिनांक १८ (प्रतिनिधी ) : आदिवासी दिनानिमित्त गव्हाले येथे आयोजीत सप्ताहातील कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

 

गव्हाले येथे आज वीर एकलव्य जयंती व आदिवासी दिनानिमित्त एकलव्य आघाडी व जय संघर्ष ग्रुपच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी बांधवांच्या हितासाठी आपण कटीबध्द असल्याचे नमूद केले.

 

या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह मानखादादा तडवी, आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमितदादा तडवी, रूखसानाबाई तडवी, शानुरबाई तडवी, ममताबाई तडवी, असलमदादा तडवी, मुसा तडवी, अरमान तडवी, अकबर तडवी, अतुल तडवी, समीर तडवी, इजाज तडवी, लाला तडवी, अजीम बेग, असलम तडवी, किरण पाटील, अप्पा पाटील, आनंद चौधरी, सुनील सुतार, अरूण तांबे, सुधाकरभाऊ, दीपक पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अशोक सपकाळे, रवींद्र पाटील, नामदेव परदेशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.