तीज महोत्सवात रंगल्या वैशालीताई सुर्यवंशी 

तीज महोत्सवात रंगल्या वैशालीताई सुर्यवंशी

 

भडगाव, ( प्रतिनिधी ) तालुक्यातील रूपनगर पळसखेडा येथे साजऱ्या करण्यात आलेल्या बंजारा समाजबांधवांच्या तीज महोत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेऊन समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.

 

आज भडगाव तालुक्यातील रूपनगर येथील बंजारा समाजबांधवांनी साजऱ्या केलेल्या तीज महोत्सवात सहभाग घेतला. तीज हा बंजारा समाजाचा महत्वाचा सण असून नागपंचमी पासून याला प्रारंभ होतो. या दिवशी एका टोपली मधे तिज म्हणजे गहूचे दाणे टाकले जातात आणि सात दिवसांनी ते पारंपरिक पद्धतीने तोडले जातात. या दिवशी तांड्या तील सर्व ग्रामस्थ नायक यांच्या घरी आपली तिज ची टोपली आणतात आणि सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांना ती देऊन डोक्याला तुरा लावतात.आदल्या दिवशी मातीचे म्हातारा आणि म्हातारी बनवली जाते, त्यांना मधे घेऊन सर्व महिला पारंपरिक पद्धतीने गाणे म्हणून नगारा वाजवून नृत्य करतात. तसेंच संध्याकाळी या म्हातारा आणि म्हातारीला नदीवर जाऊन विसर्जित करतात.

 

दरम्यान, आजच्या या कार्यक्रमाला बंजारा समाजबांधवांच्या आनंदात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी या सहभागी झाल्या. प्रारंभी समाजबांधवांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांनी तीज महोत्सवातील गाण्यांवर बंजारा भगिनींच्या सोबत नृत्य केले असता उपस्थितांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी ताईंनी सर्व समाजबांधवांना तीजच्या शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह योजनाताई पाटील, गावातील पंच मंडळी तसेच आबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशवित्ोसाठी सुभाष महाराज, तात्यामहाराज, विकास जाधव, मोतीलाल राठोड,बद्री राठोड,आत्माराम राठोड यांनी परिश्रम घेतले.