रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार – अमोल शिंदे

पाचोराऱ्यात होणार सिहोर (मध्यप्रदेश) येथील १ लाख ८ हजार रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळा

——————————————————-

रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार – अमोल शिंदे

 

पाचोरा –

येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या वतीने सिहोर (मध्यप्रदेश) येथील १ लाख ८ हजार अभिमंत्रित करुन सिद्ध रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.श्री कैलादेवी माता मंदिर पाचोरा येथे सकाळी ११:०० वाजेपासून ११ पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने या महारुद्राभिषेक सोहळ्याची सुरुवात होईल. श्रावण सोमवारी दिवसभर या १ लक्ष ८ हजार रुद्राक्ष जडीत दिव्य शिवपिंडीचे अभूतपूर्व दर्शन भाविकांना यावेळी घडणार आहे.

“नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व श्रावणी सोमवार” अशा परमपवित्र त्रिवेणी शुभ मुहूर्तावर अमोल भाऊ शिंदे यांनी पाचोरा नगरीत महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. सिहोर (मध्यप्रदेश ) येथून अभिमंत्रित करून सिद्ध केलेल्या १ लाख ८ हजार पवित्र रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक पाचोरा शहरात होत आहे. धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र मानलेल्या श्रावण मासात, रक्षाबंधनाच्या निमित्त, नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने हे रुद्राक्ष पाचोरा व भडगाव तालुक्यातील माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या कुटुंबाच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ दिव्यभेट म्हणुन दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून येथील प्रत्येक बहिणीला घरपोच वितरीत करण्यात येणार आहेत.अशी माहिती अमोल शिंदे यांनी या वेळी दिली.

शास्त्रामध्ये रुद्राक्षला अत्यंत पवित्र व महत्त्वाचे स्थान आहे. सिहोर (मध्यप्रदेश) येथील अलौकीक अध्यात्मिक शक्ती असलेले पवित्र व अभिमंत्रित तथा सिद्ध केलेले रुद्राक्ष या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमोल भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवारपासून बहिणींच्या घराघरात श्रद्धापूर्वक पोहोचते केले जाणार आहेत. श्रावण सोमवार निमित्त आयोजित या महारुद्राभिषेक सोहळ्याला पाचोरा येथील श्री. कैला देवी माता मंदिरात उपस्थिती द्यावी व रुद्राक्ष जडीत अलौकिक शिवपिंडीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन अमोल भाऊ शिंदे यांनी या निमित्ताने केले आहे.