भर श्रावणात नेवाशात गळा चिरून खून, जिल्ह्यात प्रचंड खळबळ, पोलिसांचे नागरिकांना माहिती कळविण्याचे आवाहन
(सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा) श्रावण महिना हा हिंदु धर्मियांचा अतिशय पवित्र महिना संबोधला जातो.भगवान शंकराच्या मंदिरात सर्वत्र अखंडपणे ओमःनमशिवाय या मंत्राचा जप सुरू असतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहलेल्या नेवाशात मात्र भर श्रावणात एका तरुणाचा गळा चिरून खुन करण्यात आला आहे. संबंधीत मयताविषयी काही माहिती असल्यास नेवासा पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले आहे. या बाबदची घटना अशी की सोळा आँगष्ट रोजी शुक्रवारी सकाळी नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात शेतात गवत कापणाऱ्या एका शेतकऱ्यांला गळा चिरलेल्या आवस्थेतील एक म्रुतदेह आढळून आला. ही माहिती स्थानिक पत्रकार, आणि पोलिस पाटील यांनी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये कळविली. खुनाची माहिती मिळताच नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,उपनिरीक्षक विजय भोंबे,विकास पाटील, मनोज अहिरे, हवालदार केदार, पोलीस नाईक गांगुर्डे, पो.काँ.वैद्य,वाघ, करजकर हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी हजर झाले.सदर ठिकाणी जाउन पाहिले असता तेथे तीस ते पस्तीस वयोगटातील पुरुषाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गळा चिरण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत पुनतगावचे पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.772/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103,(1),238 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. खुनाची माहिती कळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,शेवगाव विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी भेट देऊन पंचनामा करून म्रुतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवून दिला. सदर गुन्ह्याचा तपास अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,आणि शेवगाव विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत.सदर मयत ईसमाची ओळख पटलेली नाही. सदर मयत व्यक्ती विषयी कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे. मयताच्या अंगावर निळ्या रंगाची जिन्सची पँट आहे. अंगात आकाशि रंगाचा टी शर्ट आहे.लाल रंगाचा माचो बनियन आणि लाल रंगाची अंडरवेअर आहे. पायात ग्रे कलरचे पायमोजे असुन कमरेला तपकिरी रंगाचा बेल्ट आहे. उजव्या हाताच्या मनगटात सप्तरंगी नाडा ,कमरेला लाल करदोरा,बोटात अंगठी असुन त्यावर महांकाल असे लिहलेले आहे. उजव्या हातावर शिवशंकराचे चित्र आणि “कालभैरव” असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीची जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात मिसींग डायरीत व्यक्ती हरवल्याची नोंद आहे काय या बाबीवर प्रकाश टाकण्यात यावा आणि नंतर परिणाम कळविण्याचे जिल्ह्यातील सर्व पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे नेवासा तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे. आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांना खुनाबाबद गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली असुन खुनी इसमापर्यंत निश्चितच पोलीस पोहोचतील असा विश्वास नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.