विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचितच्या ‘लाडक्या बहिणी’ नाराज;महिला जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचितच्या ‘लाडक्या बहिणी’ नाराज;महिला जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

 

 

 

पाचोरा (वार्ताहर) दि.17

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सध्या लाडक्या बहिणींची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडी पक्षात काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी मात्र पक्षातल्या अंतर्गत कलहाला कंटाळून जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी,

जनाबाई पाटिल, प्रमिला तामस्वरे,सुलोचना खोब्रागडे,

संघटक कांता कदम,पोर्णिमा सोनवणे,

रत्ना खरे, तालुका सचिव सुनील कदम या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पदांचे राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत.दरम्यान पक्षाने आपल्या कामाची योग्य दखल घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विविध राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी सह निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सरसावलेले असतानाच जळगाव जिल्ह्यात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या गोटात अंतर्गत कलह समोर आला आहे

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने जळगाव

लोकसभेतून सुमारे 20000 पेक्षा अधिक मते मिळवली होती. यावेळी प्रचारासाठी स्वतः पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी पाचोरा येथे जाहीर सभा घेतली होती या सभेचे नियोजन संगीता साळुंखे यांच्यासह स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा होत आहे

दरम्यान यंदाची विधानसभा निवडणूक ही सर्वच मतदारसंघात अतिशय चूरशीची होणार असल्याचे दिसत असतानाच वंचितच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक ठिकाणी लक्ष लागून राहिलेले आहे.त्यामुळे संगीता साळुंखे यांनी अचानक दिलेल्या पदाच्या राजीनामामुळे त्यांच्या आगामी भूमिकेकडे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.