क्रीडा क्षेत्रात गुरुकुल ने मिळविला तिहेरी विजयाचा मुकुट

क्रीडा क्षेत्रात गुरुकुल ने मिळविला तिहेरी विजयाचा मुकुट

पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसोबतच चेस व व्हॉलीबॉल स्पर्धेमध्येही बाजी मारली..

नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळविल्या नंतर दि-०५-०८-२४ रोजी गो.से हायस्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय चेस स्पर्धेतही गुरुकुल ची विद्यार्थिनी श्रावणी अलहीत हिने यश संपादन केले तसेच दि. १२- ०८- २४ रोजी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित झालेल्या वयोगट १७ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतही गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवून गुरुकुल स्कूलला तिहेरी विजयाचे मुकुट चढविले व शाळेचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावून परंपरा कायम ठेवली आहे. श्रावणी अलाहित (वाणी), चैताली गायके, चेतना वाधवा, निकिता रत्नानी, निधी वरलानी, पलक पंजवानी,सिया नागरानी, सुहानी पिंजानी, दीक्षा मोरे, जिनल पटेल, पायल काळे, रुचिता पाटील, शर्वरी कुलकर्णी या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी सर, क्रिडा शिक्षिका साक्षी पवार मैडम, निलेश कुलकर्णी सर व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेचछा दिल्या.