पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते लाईफ लाईन हॉस्पिटल चे उद्घाटन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते लाईफ लाईन हॉस्पिटल चे उद्घाटन

 

 

माननीय पालकमंत्री जळगाव तसेच महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाचोरा शहरात लाईफ लाईन हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. मुनव्वर बदामी हॉल जारगाव चौफुली येथे कार्यक्रमचे आयोजन करण्यात आलेला होता. कार्यक्रमची सुरुवात मौलाना नईम रजा यांनी पवित्र कुराण पठणने केली. शेख जावेद रहीम यांनी कार्यक्रम ची प्रस्तावना प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भडगाव पाचोरा मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष पाचोरा नगरपरिषद संजय गोईल,जि.प.सदस्य मधुकर काटे, पाचोरा मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील इतर मान्यवर हे होते. आमदार साहेबांनी लाईफ लाईन हॉस्पिटल चे संस्थापक डॉक्टर इम्रान पिंजारी व डॉक्टर तबसूम मॅडम यांनी कोरोना काल तसेच गोरगरिबांना दिलेली वैद्यकीय सेवा चे कौतुक केले. त्यांनी सांगितले की मला अभिमान आहे की डॉक्टर इमरान माझे पाचोरा शहरातील पहिला मुस्लिम एमडी मेडिसिन डॉक्टर आहे. माननीय गुलाबराव पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषण मध्ये सांगितले की एखाद्या गादी भंडारच्या व्यवसाय करणारे घरात जनम घेऊनव मेहनत व जिद्दीने ह्या मुकाम प्राप्त करणारे डॉक्टर इम्रान पिंजारी यांनी मुस्लिम समाजाचे विद्यार्थ्यांसमोर चांगले उदाहरण प्रस्तुत केलेली आहे. आज आपल्या समाजात अस्याच प्रमाणे इमानदार, समाजसेवा करणारे डॉक्टरांची गरज आहे जेणेकरून कोणत्याही गोरगरीब व्यक्तीला आपले इलाज साठी आपली शेत जमीन किंवा घरदार विकण्याची गरज पडणार नाही.पहिली ते बारावी पर्यंत उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊन गायनॅकॉलॉजिस्ट बनणारी डॉक्टर तबस्सूम मॅडम यांचे शैक्षणिक जीवनावर शेख जावेद रहीम यांनी प्रकाश टाकून दाखवले की, ज्याप्रमाणे आपल्या समाजात भ्रम पसरवण्याच्या प्रयत्न केला जातो की फक्त इंग्रजी माध्यम मध्ये शिकणारे विद्यार्थीही पुढे जाऊ शकतात, डॉक्टर तबस्सुम मॅडम सारखे विद्यार्थी हे भ्रम तोडण्याच्या कार्य करतात. ते सिद्ध करतात की शिक्षणाचे मार्गामध्ये भाषा अडथळा ठरत नाही. गुलाम रसूल पिंजारी यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.अमोल शिंदे, वैशालीताई,सचिन सोमवंशी, ॲक्टर सचिन कुमावत, शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विजय ठाकूर यांनी हॉस्पिटलला भेट दिली. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वीय बनवण्यासाठी गुलाम रसूल फॅमिली, रईस रसूल, जकी खाटीक,मसूद कुरेशी, मन्सूर नगारीया, शाकीर कुरेशी, वसीम सय्यद,यांनी परिश्रम घेतले.