‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले पाचोरा शहर !
शिवसेना-उबाठाच्या तिरंगा रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
पाचोरा, दिनांक 15 (प्रतिनिधी ) : आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस पाचोरेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून याप्रसंगी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमल्याचे दिसून आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. महाराणा प्रताप चौकापासून तिरंगा रॅलीची सुरूवात झाली. या रॅलीच्या अग्रभागी वैशालीताई सुर्यवंशी या हातात भव्य राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाल्या. यात सहभागी झालेल्या आबालवृध्दांनी जोरदार घोषणा दिल्यामुळे परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारून गेला. ठिकठिकाणाहून लोक या यात्रेत सहभागी झाले. भारत माता की जयच्या जोरदार जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, देशमुखवाडी, जामनेर रोडमार्गे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयापर्यंत यात्रा काढण्यात आली. येथे भारतमाता पूजन करून राष्ट्रगिताने या तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.
या तिरंगा रॅलीमध्ये उद्धव मराठे, दीपक राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, अनिल सावंत, दिपक जिभाऊ पाटील, योजनाताई पाटील; जे.के. अण्णा पाटील, पुष्पाताई परदेशी, शंकर मारवाडी (आप्पा); तिलोत्तमाताई मौर्य, कुंदन पांड्या, सुरेखाताई वाघ; मनोहरभाऊ चौधरी, जिजाबाई चव्हाण, माधव जगताप (उपजिल्हाप्रमुख); चेतन पाटील (तालूका प्रमुख युवासेना); चेतन आर. पाटील (शहर प्रमुख युवासेना); यश बिरारी (उपशहर प्रमुख); सुशील महाजन (उपशहर संघटक); डी. डी. पाटील सर, नरेंद्र राजपूत, उमेश पाटील, नितीन बाविस्कर. सनी पाटील, निलेश सोनवणे, अनिता पाटील, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे,पप्पू जाधव,संजय चौधरी, गजाजन सावंत, राजेंद्र धनगर, नामदेव चौधरी, गफ्फार सैय्यद, वैभव भावसार, नितीन लोहार, प्रवीण मोरे, हेमंत पाटील, हरीभाऊ पाटील, रवीश सोनवणे, विकास वाघ, बालू अण्णा पिंप्री, संतोष पाटील, भिकन वाघ, अरुण तिघे, ज्ञानेश्वर चौधरी, भैय्या पाटील, प्रितेश जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, शशी बोरसे आदी मान्यवरांसह शिवसेना, युवासेना महिला आघाडी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.