आदिवासींच्या हितासाठी कटीबध्द : वैशालीताई सुर्यवंशी

आदिवासींच्या हितासाठी कटीबध्द : वैशालीताई सुर्यवंशी

 

पाचोरा, दिनांक 12 (प्रतिनिधी ) : आदिवासी समुदायाच्या प्रगतीसाठी आपण कायम कटीबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील लासुरे गावातील कार्यक्रमात बोलत होत्या.

 

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य पाचोरा तालुक्यातील लासुरे गावात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वैशालीताई सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, वीर एकलव्य, तंट्यामामा भीळ आदी महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

 

वैशालीताईंनी आपल्या मनोगतातून आदिवासी समुदायाने विविध क्षेत्रांमध्ये चांगली वाटचाल केली असली तरी मोठी जनसंख्या ही शासकीय योजनांपासून वंचित असल्याने प्रगतीपासून कोसो दुर आहे. यांच्या उत्थानासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी, उध्दव मराठे, प्रदीप पाटील,अजय देवरे, उत्तम देवरे, सिकंदर तडवी, शरीफदादा तडवी, दिनेश देवरे, संतोष पाटील, जाबीर तडवी, कपिल देवरे, अतुल पाटील, गुलाब तडवी, शकीदर तडवी, मस्तान तडवी, रवींद्रदादा खैरनार, शरजा तडवी, शारूख तडवी, संदीप पाटील, फिरोज तडवी, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.