गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मारली बाजी

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मारली बाजी

तब्बल ९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निवड

 

– पाचोरा येथे ३ऑगस्ट पासून आयोजित शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत घवघवीत यश संपादन केले आहे. पाचोरा येथील मानसिंग नगर मधील बॅडमिंटन खेळाच्या मैदानावर शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये पाचोरा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला. यात इतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना नमवित तब्बल १४ वर्ष आणि १७ वर्षाच्या आतील एकूण ९ विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केल्याने त्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच १४ वर्ष आणि १७ वर्षाच्या आतील विद्यार्थिनींनी बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत लढा दिला. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका साक्षी पवार व क्रीडा शिक्षक कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले. १७ वर्षाच्या आतील वैभव परदेशी ,लोकेश पाटील ,लक्ष पूर्सनानी

घनश्याम सपकाळ तसेच

१४ वर्षाच्या आतील वैभव महाले, पृथ्वीराज परदेशी, हर्ष जाधव ,प्रतीक ललवाणी व तेजस कुंभार या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

तालुका स्तरीय स्पर्धेत पहिल्याच दिवशी विजयाचा श्रीगणेशा गुरुकुल पासून झाल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे कौतुक शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी व शिक्षक वृंद यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.