चोपडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्वप्नील पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड

चोपडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्वप्नील पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड

-संस्था व महाविद्यालयातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन-

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील टी.वाय.बीएस्सी. भौतिकशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी स्वप्निल दिनकर पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतघवघवीत यश संपादन केले असून त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

स्वप्नील पाटील यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटीलयांच्या हस्ते अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, उपप्राचार्य एस.पी.पाटील, पर्यवेक्षक पी.एस. पाडवी, प्रा. डॉ.बी.एम.सपकाळ, व्ही.पी. हौसे, प्रा.एस. बी. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.