चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही – आ. सत्यजीत तांबे 

चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही – आ. सत्यजीत तांबे

 

– देशावर पहिला हक्क आदिवासी समजाचा

 

प्रतिनिधी,

 

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेला आमदार सत्यजीत तांबे ही उपस्थित होते. आज आदिवासी समाज प्रगती करत आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे करत आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान

चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही, असे आमदार सत्यजीत तांबे शोभायात्रेदरम्यान म्हणाले.

 

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, पूर्वी अनेक सुविधांपासून वंचित असणाऱ्या आदिवसी समाजाने ७५ वर्षात मोठी प्रगती केली आहे. आज समाजात आदिवासी समजला शिक्षणाचा हक्क राज्यघटनेमुळे मिळाला आहे. या समजतील तरुण पिढी आयएस, आयपीएस, शिक्षक, डॉक्टर, सरकारी वकील बनत आहेत. मुलींना शिक्षणाच्या अधिकार मिळाला आहे. त्यामुळे हे संविधानात कितीही सुधारणा करण्यात आली तरी संविधान कोणी बदलू शकणार नाही. आपल्या देशावर, जगावर पहिला अधिकार हा आदिवासी समाजाचा आहे आणि राहील.

 

नाशिक येथे शासकीय नोकर भरतीसंदर्भातील न्याय मागण्यांसाठी आदिवासी समाजाकडून उपोषण करण्यात आले. आंदोलनासाठी ही मुले महाराष्ट्रातल्या १३ जिल्ह्यांमधून आली होती. आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. तांबेंनी सांगितले.