गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात “राष्ट्रीय भालाफेक दिन” मोठ्या उत्साहात संपन्न

_गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात “राष्ट्रीय भालाफेक दिन” मोठ्या उत्साहात संपन्न….!!!!_

 

*कोळगाव ता-भडगाव-* जळगाव जिल्हा अॕथेलेटीक्स असोसिएशन व भडगाव तालुका अॕथेलेटीक्स असोसिएशनच्या वतीने ७ अॉगस्ट २०२४ रोजी तिसरा “राष्ट्रीय भालाफेक दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,सदर कार्यक्रमावेळी उपस्थितांकडून भाल्याचे पुजन करण्यात आले,७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलिंपिक मैदानी सपर्धेत निरज चोप्रा यांनी भारतास भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त करून दिल्याबद्दल तो दिवस भारतीय सरकारतर्फे “राष्ट्रीय भालाफेक दिन” साजरा करण्यात येतो.

सदर कार्यक्रम गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील, उपप्राचार्य अनिल पवार,कार्यवाहक रघुनाथ पाटील, क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी आदींच्या सहकार्याने पार पडला.