उजनी पिंपळगावच्या शालेय विद्यार्थीनीचे तोंड, हात,पाय बांधून गच्चीवर टाकले, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

उजनी पिंपळगावच्या शालेय विद्यार्थीनीचे तोंड, हात,पाय बांधून गच्चीवर टाकले, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, पालकांनी घाबरून न जाण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) अहमदनगर पासून दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर तालुक्यातील उजनी पिंपळगाव येथील एका शालेय विद्यार्थीनीचे तोंड हात पाय बांधून गच्चीवर टाकले बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनी घाबरून न जाण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.गावातील माध्यमिक विद्यालयातील तेरा वर्षीय विद्यार्थीनी शाळेच्या सौचालयात जात असताना अज्ञात व्यक्तीने तीचे तोंड, हात,पाय बांधून तीला गच्चीवर बांधून ठेवले.सदर घटना ही सोमवारी पाच आँगष्टच्या सायंकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान घडली. मुलीचे तोंड, हात,पाय बांधलेल्या अवस्थेतील एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.या घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील पालक वर्गात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला मंगळवार दि.सहा आँगष्ट रोजी भा.द.वि.कलम 137(2),127(2) प्रमाणे अज्ञात व्यक्ती च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनीही तात्काळ घटना ग्रस्त गावात जाउन घटनेची पाहणी केली. आणि घडलेल्या घटनेची योग्य रितीने चौकशी करून लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल असे सांगितले. अहमदनगर शहर आणि परीसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसेच अपहरणाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. मुलींचे हात पाय बांधून शाळेच्या छतावर नेन्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. सदर विद्यार्थीनी ही पावणे पाचच्या दरम्यान बाथरूमला गेली होती. तीच्या सोबत अजूनही एक तीची मैत्रीण होती. ती लगेचच आपल्या वर्गात निघून गेली. पण अंन्यायग्रस्त संबंधित विद्यार्थीनीला तिघांनी बांधून टाकले.आणि तीच्या समोर एक व्यक्ती उभा होता तो फोनवर सारखे बोलत होता की रात्रीआठ वाजता घेऊन जायचे आहे. पण शाळेजवळ महादेवाचे मंदिर आहे.तेथे आरती करण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.त्यांना सदर मुलीच्या कन्हन्याचा आवाज आला असता त्यांनी गच्चीवर जाउन पाहिले असता त्यांना सदर मुलगी तोंड, हात ,पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. ग्रामस्थांनी तोंड,हात पाय सोडल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी -विद्यार्थ्यीनीचे पालक मुलींना शाळेत पाठवावे की नाही या चिंतेत आहेत.ज्यावेळी शाळेच्या गच्चीवर हा सर्व प्रकार होत असताना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नेमके काय करत होते हे एक न उलगडणारे कोडेच आहे. शाळेच्या परीसरातील काही घरभेदी असन्याची शक्यता काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.सौचालयात जाताना तीच्या सोबत दुसरी मुलगीही होती तीने संबंधीत लोकांना पाहिले नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. शालेय विद्यार्थीनीच्या पालकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.अहमदनगर पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास नठेवता जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संयम ठेवन्याचे आवाहन केले आहे.पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.