नगरदेवळा गटात शिवसेना-उबाठाचा झंझावात वैशालीताई सुर्यवंशींच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

नगरदेवळा गटात शिवसेना-उबाठाचा झंझावात वैशालीताई सुर्यवंशींच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

 

पाचोरा दिनांक 6 ( प्रतिनिधी ) : वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरदेवळा गटातल्या विविध गावांमधून सुमारे 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे पक्षाची या गटातील स्थिती अतिशय मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

 

वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी परिवर्तनाची साद घातली असून पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कान्याकोपऱ्यातल्या जनतेकडून याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेत आहेत. दररोजच मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळे पार पडत आहेत. यातच आता नगरदेवळा गटातील नगरदेवळा तसेच बाळद,खाजोळा व पिंपळगाव आदी गावांमधील सुमारे 300 पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतला.

 

याप्रसंगी खाजोळा येथील भाजपा बुथप्रमुख श्रीकृष्ण शिवराम पाटील, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब भिवसन पाटील, माजी उपसरपंच वसंत बाजीराव पाटील, प्रदीप मन्साराम पाटील; माजी सरपंच तथा बाजार समिती सदस्य नामदेव अहिरे, उज्ज्वल रमेश पाटील; राजेंद्र भालेराव, भाजप पदाधिकारी सुनील विठ्ठल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधून अशोक बबन पाटील व भय्या पाटील यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

 

यासोबत, पिंपळगाव येथील प्रशांत पाटील, किरण पाटील, विजूआबा गायकवाड, वाल्मीक गायकवाड व राहूल गायकवाड येथील देखील पक्षात प्रवेश घेतला. नगरदेवळा येथील राऊळ गल्लीतल्या शिवराणा मित्रमंडळ, महात्मा फुले ग्रंथालय, हनुमान नगर, माहेजी चौक आदी परिसरातील कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच, बाळद येथील माजी उपसरपंच मोतीलाल आबा व सुरेश काळू पाटील यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत हातात निष्ठेचा भगवा घेतला.

 

या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, अभय पाटील, दादाभाऊ चौधरी, विकास वाघ, हरीभाऊ पाटील, संजय चौधरी, गफ्फारभाई, अभिषेक खंडलवाल, अनिल सावंत, संजू मोरे, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, शशी बोरसे, संदीप पाटील, किरण चौधरी, सचिन जगताप, बंटी हटकर, गजानन सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.