प्रकाश तेली यांचा बिजली संरक्षण काव्य संग्रह वीज बचतीच्या कार्यास गती देणार – अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला

प्रकाश तेली यांचा बिजली संरक्षण काव्य संग्रह वीज बचतीच्या कार्यास गती देणार – अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला

 

 

 

जळगांव :- प्रकाश रामदास तेली यांचा बिजली संरक्षण काव्य संग्रह प्रेरणादायी असून वीज बचतीच्या कार्यास गती व चालना देणारा आहे असे प्रतिपादन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी बिजली संरक्षण काव्य संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी सांगीतले प्रकाश तेली यांच्या बिजली संरक्षण काव्य संग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे त्यांच्या हस्ते झाले.

 

 

 

बिजली संरक्षण काव्य संग्रहात काय आहे :-

 

बिजली संरक्षण काव्य संग्रहात विजेचे महत्व, विजेची गरज, विजेचा दुरुपयोग, वीज बचतीचे गरज, व राष्ट्रा समोरील विजेचे संकट याबाबत सविस्तर माहिती ह्या काव्य संग्रहात दिलेली आहे. दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच महत्त्वाच्या आहेत यामध्ये विशेषत: वीज सुद्धा खुप गरजेची झालेली आहे जर वीज कमी प्रमाणात भेटली तर दैनंदिन कार्यात बाधा निर्माण होते आणि वैयक्तीक आणि राष्ट्रीय उत्पादकता देखील कमी होते.

 

वीज हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे अनेक ठिकाणी वीजेची उपकरणे गरज नसतानाही वापरली जातात जी आपल्या आणि देशाच्या हितासाठी अजिबात योग्य नाही ‘बिजली संरक्षण’ या काव्यसंग्रहात सर्व 81 कविता विजेशी संबंधित असून विजेच्या बाबतीत सर्व पैलुंचा उलगडा करतात आणि प्रत्येक नागरिकास आपल्या जबाबदारीची जाणीव देखील करून देतात यामुळे वीज बचत आणि वीज संवर्धन मोहिमेला नक्कीच चालना मिळेल.

 

कोण आहेत प्रकाश तेली :- प्रकाश तेली यांचे आतापर्यंत 12 सामाजिक काव्य संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांनी कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम देखील केलेला आहे त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली असून त्यांचे आता शिक्षणाचे महत्त्व ह्या काव्य संग्रहाचे काम सुरु आहे.

 

प्रकाश तेली कवी, लेखक, गीतकार, व पत्रकार असून त्यांनी 5000 पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य/स्लोगन देखील लिहिलेले आहेत.