उत्तम रोजगारासाठी मेहनत आवश्यक : वैशालीताई सुर्यवंशी

उत्तम रोजगारासाठी मेहनत आवश्यक : वैशालीताई सुर्यवंशी

‘मल्टीमीडिया’च्या महारोजगार मेळाव्यात तरूणांना मार्गदर्शन

 

जळगाव, दिनांक 3 (प्रतिनिधी ) : ”मी स्वत: शेतकऱ्याची मुलगी असून त्यांच्या वेदना मला माहित आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगला रोजगार मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी” असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. मल्टी मीडिया फिचर्सच्या वतीने जळगावात आयोजीत करण्यात आलेल्या महा रोजगार मेळाव्यातील पहिल्या दिवसाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होते.

‘मल्टीमीडिया फिचर्स’च्या वतीने आज जळगावातील आदित्य फार्म येथे आजपासून भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातील समारोप कार्यक्रमाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. या महामेळाव्यात आज सकाळी नोंदणी आणि दुपारी मुलाखती झाल्यानंतर सायंकाळच्या समारोप सत्रात निवड झालेल्या उमेदवारांना वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशीलभाऊ नवाल यांचे कौतुक केले. राजकारणात बेरोजगार आणि शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर आणि खरं तर शोषण होत असते. यामुळे आयुष्यात चांगला रोजगार आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मेहनतीला कुठेही कमी पडता कामा नये असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्याला चांगला रोजगार हवा तर आपण चांगले शिक्षण घ्यावे. आणि जिथेही नोकरी लागेल तिथे परिश्रम करावे, आणि लक्षणीय म्हणजे कधीही व्यसनांचा आहारी जाऊ नये असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला मल्टीमीडिया फिचर्सचे सीईओ सुशीलभाऊ नवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.