ऐकून घे शैला,नायब साहेबांच्या पहिला, कागदात घोटाळा करायचा नाही गं, तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 

ऐकून घे शैला,नायब साहेबांच्या पहिला, कागदात घोटाळा करायचा नाही गं, तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा) अहमदनगर शहरातील सावेडी उपविभागात आणि महानगरपालिका हद्दीत १८,००० चौरस फुटाचा प्लाँट आहे. सदर प्लाँटचे अहमदनगर महानगरपालिका यांचेकडील कागदपत्रांचे शासकीय रेखांकन करून सदर प्लाँटच्या नवीन बांधकाम करण्यासाठी २२ स्वतंत्र विभागात उपविभागणी प्रमाणे नोंदी करायच्या होत्या. सावेडीचे तलाठी सागर एकनाथ भापकर यांनी सदर १८,००० चौरस फुटाच्या प्लाँटच्या एकूण २२ विभागात स्वतंत्र आँनलाईन फेरफार नोंदीही अपलोड केलेल्या आहेत.त्या मोबदल्यात ४४००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४०,००० रुपये लाच स्विकारण्याची तयारी तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी दर्शविली. सावेडी तालुका व जिल्हा अहमदनगर विभागाच्या मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडे बावीस प्लाँटच्या फेरफार नोंदी केल्याच्या बदल्यात ४०,००० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मांन्य करून लोकसेवक तलाठी भापकर यांच्या साठी वेगळे प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे बावीस प्लाँटचे ११,००० रुपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ सक्षम अधिकारी मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांना माहिती देण्यात आली आहे. या सापळा पथकातील पोलीस काँन्स्टेबल सचिन सुद्रुक,पो.काँ.बाबासाहेब कराड,चालक पो.हे.काँ.हारुन शेख यांनी ही कामगिरी बजावली आहे. अहमदनगर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याचे लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा आठ दहा दिवसात हे दुसरे नवीन प्रकरण घडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी लोखंडे साहेब यांनी कोणीही लोकसेवकाने लाच मागितल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.हा सारा प्रकार पाहून एका चारोळ्या गाण्याची आठवण झाली.”ऐकून घे शैला,नायब साहेबांच्या पहिला, कागदावर घोटाळा करायचा नाही गं” असा घोटाळा करायचा नाही गं.