चोपडा महाविद्यालयात ‘कारगिल विजय दिवसानिमित्त’ राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान
चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा व प्रताप विद्यामंदिर, चोपडा एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै २०२४ रोजी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला.याप्रसंगी कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिकी जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रताप विद्या मंदिर येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून केली.
याप्रसंगी चोपडा शहरातील माजी सैनिकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाप्रसंगी चोपडा शहरातील माजी सैनिक संदीप विठ्ठल बडगुजर, साहेबराव चेतराम पाटील, लक्ष्मण पांडुरंग महाजन, प्रकाश धुडकू चौधरी, सचिन गोपाल महाजन, मनोहर अर्जुन पवार, जितेंद्र मधुकर वाघ व अनिल बडगुजर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ व पर्यवेक्षक ए. एन. बोरसे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
या कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक गोपाल सोनवणे यांनी कारगिल युद्धाबाबत माहिती दिली व सैन्यातील सैनिकांचे जीवन विशद केले. या कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक संदीप बडगुजर यांनी माजी सैनिकांच्या जीवनावरील कवितेचे वाचन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमांप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ. बी. एम.सपकाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप विद्यामंदिर चोपडाचे एनसीसी अधिकारी रोहन पाटील व श्रीमती जे. आर. बडगुजर यांनी परिश्रम घेतले.यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.