शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहोत आमदार किशोर पाटील

शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहोत आमदार किशोर आप्पा पाटील

 

शिक्षण घेणारे गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही मदतीला आपण सदैव तयार आहोत, त्यांनी फक्त शिक्षण घ्यावे कोणतीही चिंता करू नये असे प्रतिपादन भडगाव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एका सत्कार समारंभात मध्ये व्यक्त केले. गोराडखेडा उर्दू केंद्र व शिक्षक सेना पाचोरा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ नवीन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज येथे ठेवण्यात आलेला होता ह्या कार्यक्रम मध्ये आमदार किशोर आप्पा पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे होते. पवित्र कुराणचे पठण व नाते पाखणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन आकीब सर यांनी केले. कार्यक्रमचे उद्दिष्ट शेख कदिर यांनी मांडले. शेख जावेद रहीम यांनी मनमोहक अंदाज मध्ये येणारे मान्यवरांच्या परिचय व त्यांची कामगिरी व्यक्त केली. उर्दू माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या साठी एवढा मोठा कार्यक्रम मी पहिल्यांदाच अटेंड करतो. महाराष्ट्र शासनाची योजना लाडकी बहन याचा फायदा मुस्लिम विद्यार्थिनींना होणार. मुस्लिम अल्पसंख्यांक असो की कोणतेही धर्म जातीच्या असो मी सदैव त्यांच्याशैक्षणिक मदतीला उभा आहे असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. या वेळी समुपदेशन होऊन नवीन आलेल्या शिक्षकांचाही गटशिक्षणाधिकारी पाचोरा पंचायत समिती समाधान पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार झाला. आमदार साहेबांनी उर्दू शाळा साठी केलेल्या पाठपुरावातून 24 जुलै रोजी पाचोरा तालुक्यात पाच नवीन शिक्षक मिळाले. आनंदीत पालकांनी यावेळी ह्या सहकार्य बद्दल आमदार साहेबांचे सत्कार व कौतुक केले. यावेळी पाचोरा तालुक्यात बदल घडणारे व उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक शेख जावेद रहीम व शेख कदिर शब्बीर यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी शेख जावेद रहीम, शेख कदिर शब्बीर, शेख सलमान शौकत, आसिफ जलील, मुख्याध्यापक मुख्तार पिंजारी,नफिस टकारी ,रंगरेज दादा, आदिल शाह सय्यद जाफर यांनी प्रश्न परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी व्यासपीठावर गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील साहेब, माजी नगराध्यक्ष संजय गोईल, पत्रकार प्रविण ब्राह्मणे,शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष दादासो श्री राजू पाटील सर, डॉक्टर आलम देशमुख, जावेद खलील सर,नूर बेग , अब्दुल गणी सेठ,अंनुय मेंबर, अजहर मोतीबाला, अन्सार पटवे, तालीब कुतुबुद्दीन, अब्दुल खालिक काकर, अबरार सर, नवीद देशमुख,विजय ठाकूर, दिलीप महाजन, जिया सर, रेहान सर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम मध्ये पाचोरा शहर, भडगाव शहर, नगरदेवळा,कुऱ्हाड, लासगाव, शेंदुर्णी, पिंपळगाव हरेश्वर गावातून विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला. गुणवंत साठ विद्यार्थ्यांना आमदार साहेबांनी प्रत्येकी पाचशे रुपये व हजार रूपयांची बक्षीस दिली. जावेद रहीम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आमदार महोदय यांनी केलेल्या विदयार्थय्यांच्या यथोचित सत्कारामूळे समस्त शिक्षक,पालक आणि विद्यार्थी समुदायाने आनंद व्यक्त केला.