चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त ‘क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा

चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त ‘क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे शिक्षणशास्त्र विद्यालयात दि.२४ जुलै २०२४ रोजी “शिक्षण सप्ताह’’ निमित्त ‘क्रीडा दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर समन्वयक प्रा.डॉ.शैलेश वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पी.एस.पाडवी व शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सौ.क्रांती क्षीरसागर यांनी ‘क्रीडा दिवस व आरोग्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी खेळांचे असलेले महत्व काही उदाहरणांवरून विद्यार्थ्यांना पटवून दिले.यावेळी त्यांनी ‘विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे आरोग्य व शरीरस्वास्थ्य क्रिडेच्या माध्यमातून कसे जोपासावे’ याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी छात्र विद्यार्थ्यांच्या खेळाचे प्रात्याक्षिक घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राअध्यापिका मिनल योगेश कोळी यांनी केले तर आभार काजल जी. महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.