पंढरपूरहुन आलेल्या वै. सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे तिसगाव, जवखेडे परिसरात जोरदार स्वागत

पंढरपूरहुन आलेल्या वै. सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे तिसगाव, जवखेडे परिसरात जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात वाघोली पासून तर थेट देहूआळंदी,पैठण, पंढरपूर पर्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि (८९) वर्षांची अखंड परंपरा असलेल्या वै.सदगुरु यादवबाबा वाघोलीकर यांच्या पंढरपूरहुन आलेल्या दिंडीचे तिसगाव जवखेडे परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा माघारी पायी विणा पताका खांद्यावर घेऊन निघालेले दिंडीचे वारकरी आणि पालखीचे खरे भोई वाघोलीचे माजी सरपंच बाळासाहेब जमधडे, भिमराज दातीर, भरत लवांडे, शिवाजी कासार या चौघांना वाटेत ठिकठिकाणी थांबवून सन्मानित करण्यात आले.घाटा पिंप्री येथे रामदास आमटे, तिसगाव येथे भरत लवांडे यांच्या वस्ती वर अरुण पुंड,जवखेडे दुमाला येथे संतराम नेहुल,वाघोली येथील परीसरात अप्पा जमधडे,भाउसाहेब जगदाळे, भाउराव जोगदंड ,रमेश दातीर, सुभाष वांढेकर, विलास वांढेकर,यांनी जोरदार स्वागत केले. पांडुरंग मुरलीधर दातीर यांनी प्रितीभोजन दिले. ह.भ.प. भाउसाहेब महाराज भालसिंग यांनी अनेक संकटांना तोंड देत या दिंडीचा अटकेपार झेंडा फडकवत ठेवून

अविरतपणे आजपर्यंत ही परंपरा जोपासुन वै.यादवबाबा यांच्या कार्याचा उद्धारच केला आहे.दिंडीच्या काळात प्रत्यक्ष वै.सदगुरु यादवबाबा हे वारकऱ्यांच्या मुखातून आपले बोल बोलतात हा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना आलेला आहे असे ह.भ.प. भालसिंग महाराज यांनी या दींडीचा समारोप करताना सांगितले. यावेळी ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसिंग, दिलिप भालसींग,रमेश भालसिंग, रामा नेहुल,घनश्याम नेहुल, वाघुले महाराज, चोपदार,चव्हाण मामा, मळू बोरुडे, रथचालक भिवसेन शेळके,तुळशीची मानकरीण जनाबाई वाघुले, दिनकर फुंदे,शिंदे मामा,सोपान जमधडे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते.४ जुलै रोजी प्रस्थान झालेल्या आणि नंतर एकवीस दिवस चाललेल्या या दिंडी सोहळ्याची २४जुलै रोजी सायंकाळी हरिपाठानंतर सांगता झाली.