शिला दादा कोकडे यांचा योगसाधना पुरस्काराने गौरव
विशेष प्रतिनिधी :- वरिष्ठ योग शिक्षिका शिला दादा कोकडे यांचा साप्ता . खान्देश बाजार व दिशा राज फाउंडेशन च्या वतीने योगसाधना पुरस्कार देऊन काल दिनांक 21 जुलै रोजी सन्मान करण्यात आला
कोण आहेत शिला दादा कोकडे:- शिला दादा कोकडे ह्या योग शास्त्रात मास्टर असून न्यू औरा हेल्थ आणि फिटनेस सेंटर च्या त्या संचालिका आहेत मागील तीन वर्षापासून त्या आर्ट ऑफ़ लिविंग च्या वरिष्ठ शिक्षिका म्हणून देखील कार्य करीत असून त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त जणांना योगाचे प्रशिक्षण दिलेले आहे आणि पुढील देखील देत आहेत तसेच शिला दादा कोकडे ह्या विविध कंपन्यांमध्ये व ग्रुप मध्ये देखील मोफत योग शास्त्राचे धड़े देत असतात
काय म्हटले आहे त्यांच्या सन्मानपत्रात:- आपल्या योगसाधना आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे समाजाला व देशाला दिशा मिळत असून राष्ट्र निर्मितीच्या कार्याला बळ मिळत आहे आपल्या सारख्या महनीय व्यक्तींमुळेच देशाचा पाया भक्कम होत असतो आणि राष्ट्राची उन्नती देखील वेगाने होत असते आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
शिला दादा कोकडे यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.