पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व पोलीस कॉन्स्टेबल श्री विनोद बेलदार यांच्या तत्परतेमुळे फाशी घेणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण
पाचोरा येथील शंभू नगर मधील राहणारा तरुण व्यक्ती सचिन रामदास वाघ याने आपल्या वैयक्तिक कारणामुळे जीवाला कंटाळून फाशी घेण्याचा निर्णय घेतला त्याने घरात मधून दरवाजा लावला व त्याने पाचोरा पोलीस हेल्पलाइन 112 क्रमांक यावर फोन केला व सांगितले मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे हे ऐकताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ अधिकारी श्री अशोक पवार साहेबांना सांगितले असता श्री अशोक पवार साहेबांनी ताबडतोब श्री विनोद बेलदार व पोलीस गाडीचे ड्रायव्हर श्री समीर पाटील यांना त्या स्पॉटवर रवाना करायला सांगितले व त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचत या व्यक्तीचे घर गाठले व त्या ठिकाणी आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे श्री विनोद बेलदार यांनी आपली पूर्ण ताकद लावून तो दरवाजा तोडला व आत प्रवेश करून त्याला दोरीवर लटकलेला असताना खाली उतरवले व त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला त्याच्या परिवाराच्या ताब्यात दिले सचिन वाघ यांचे जीवन संपवण्याच्या आतच त्याचा जीव वाचवला तो पूर्णपणे बरा होईपर्यंत पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व श्री विनोद बेलदार श्री समीर पाटील तिथेच थांबले होते पोलिसांमध्ये ही माणुसकी असते हे यावर सिद्ध होते पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व पोलीस कॉन्स्टेबल श्री विनोद बेलदार ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल समीर पाटील. होमगार्ड कपील पाटील यांच्या सावधान त्यामुळे आज एकाचे प्राण वाचले त्यामुळे पोलिसांची कौतुक होत आहे.