श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे विधि सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन

श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे विधि सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज दि. 20 जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती पाचोरा, तालुका वकील संघ पाचोरा व श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

.. सर्वप्रथम पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.श्री.जी.बी. औंधकर सो., न्यायमूर्ती मा. श्री.एस.व्ही.निमसे सो. ,न्यायमूर्ती श्रीमती जी.बी.बोरा मॅडम, पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण पाटील सो. यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

.. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर शाळेतील उप शिक्षिका श्रीमती श्रद्धा पवार मॅडम, ‘मुलांचे अधिकार’ या विषयावर ऍड.श्री. राहुल पाटील, ‘शिक्षणाचा अधिकार’या विषयावर ऍड. कु.चंचल पाटील, ‘पोस्को कायदा’ या विषयावर ऍड. श्री.जी.डी. पाटील यांनी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती मा. श्री.जी.बी औंधकर साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना स्री-पुरुष समानता, समाजतील आई-वडिलांचे व शिक्षकांचे स्थान, मुली व महिलांची सुरक्षा व त्यातील कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर गो.से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक छोटेसे पथनाट्य सादर केले.

याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री.आर. एल.पाटील सर श्री.ए.बी.अहिरे सर, पाचोरा वकील संघाचे पदाधिकारी सर्व सदस्य, शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते.

. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.श्री. मंगेश गायकवाड तर आभार प्रदर्शन श्री.एम.टी.कौंडिण्य सर यांनी केले.