पाचोऱ्यात एक झाड आई-वडिलांच्या नावाने आई वडिलांच्या स्मृतिदिना निमित्त ( खर्चे ) पाटील परिवाराकडून वृक्षरोपण

पाचोऱ्यात एक झाड आई-वडिलांच्या नावाने आई वडिलांच्या स्मृतिदिना निमित्त ( खर्चे ) पाटील परिवाराकडून वृक्षरोपण

 

 

 

( जनलक्ष्य न्यूज नेटवर्क )

पाचोरा कृष्णापुरी येथील कै. सौं. मथुराआई रामदास पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ( खर्चे ) पाटील परिवाराकडून वृक्षरोपण करण्यात आला या माध्यमातून निसर्गाचा समतोल तर साधला जातोच पण आपल्या आईची आठवण कायमस्वरूपी स्मरण राहते या पद्धतीने आपण सर्वांनी देखील वृक्ष लागवडीची संकल्पना करावी जन्मदिवसानिमित्त किंवा स्मृतिदिनानिमित्त असे कार्यक्रम राबविण्यात यावे.

याप्रसंगी निसर्ग फाउंडेशन पाचोरा यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले व खर्चे पाटील परिवारातील श्री रवींद्र रामदास पाटील (मा.नगरसेवक) श्री. काशिनाथ रामदास पाटील(कृ. वि. सो. सदस्य) श्री. ईश्वर रामदास पाटील श्री.मयुर सुनील पाटील ( रवी टेन्ट व परिवाराचे सदस्य उपस्थित होते ) या उपक्रमा निमित्त पाटील परिवाराच कौतुक होत आहे.